|Monday, July 31, 2017
You are here: Home » क्रिडा » डीडी संघातून डय़ुमिनीची माघारडीडी संघातून डय़ुमिनीची माघार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा दक्षिण आफ्रिकन खेळाडू जीन पॉल डय़ुमिनीने आगामी आयपीएलमधून माघार घेतली असल्याने डीडी संघाला धक्का बसला आहे.

2015 मधील आयपीएलमध्ये त्याने डीडी संघाचे नेतृत्व केले होते. 2014 पासून या संघाचा नियमित खेळाडू आहे. वैयक्तिक कारणास्तव तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे डीडीचे प्रमुख कार्यकारी हेमंत दुआ यांनी सांगितले. ‘जेपीच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. यावषी तो आपल्या संघात नसणार याचे आम्हाला वाईट वाटते. पण एक फ्रँचायजी या नात्याने आम्ही त्याची स्थिती समजू शकतो. योग्य वेळी त्याच्या जागी बदली खेळाडू घेण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असे दुआ यांनी म्हटल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

डय़ुमिनीनेही या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. ‘माघारीचा निर्णय घेताना मलाही खूप जड गेले. पण फक्त वैयक्तिक कारणासाठीच हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात फ्रँचायजींनी मला पाठिंबा दिला आणि मला समजून घेतले, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. प्रतिभावान खेळाडूंचा संच असलेल्या या संघातून खेळण्याचा आणि त्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. भविष्यात मी या संघातून निश्चितच पुन्हा खेळेन,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!