|Monday, July 31, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मानवतेच्या मैफीलीतून डॉक्टरांची रुग्णांच्या आजारावर फुंकरमानवतेच्या मैफीलीतून डॉक्टरांची रुग्णांच्या आजारावर फुंकर 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

प्रतिज्ञा नाटय़रंग संस्थेच्या स्वररंग तर्फे केशवराव भोसले नाटय़गृहात दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित , ख्यातनाम गीतकार मजरूह सुलतानपूरी यांच्या जुन्या अविट गीतांची मैफल रविवारी सायंकाळी  संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात रंगली. या मैफीलीतून गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आली.

प्रतिज्ञा नाटय़रंगतर्फे समाजातील गरजूंना आर्थिक मदत करण्यासाठी संगीत मैफिलींचे आयोजन करण्यात येते. रविवारी वैद्यकीय क्षेत्रात प्रतिथयश अशा 13 डॉक्टर्सनी आपल्या सुरेल आवाजातून मजरुह सुल्तानपुरी यांनी लिहिलेली..जाइये आप कहाँ जायेंगे…ए दिल है मुश्किल…दिवाना लेके आया है…रातकाली इक ख्वाब में आयी.. ही गाणी गायक डॉ.अजय केणी, वैशाली दामले, डॉ.अनघा कुलकर्णी, डॉ.मिलिंद तिवले, डॉ.बिना अपराध,डॉ. संजय देशपांडे, डॉ.शुभांगी जोशी, डॉ.सुश्रुत हर्डीकर, डॉ.नीरजा कुलकर्णी, डॉ.रसिका देशपांडे, डॉ.स्वप्ना शिवेश्वरकर, डॉ.वृंदा कुलकर्णी, डॉ.आदिती वाटवे यांनी सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

निवेदन डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ.प्रिया जैन यांनी केले. सर्व गायक वादकांचा सौ.शर्मिला मोहिते यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या संगीत मैफिलीस डॉ. अजय केणी,हरीश वाधवानी, पुष्कर जोशी,शशिकांत वडगावकर , डॉ. सुयोग कुलकर्णी, विश्राम कुलकर्णी , अनिस शिकलगार यांचे मोलाचे सहकार्य लाभले

यावेळी सतीश साळोखे, प्रवीण लिंबाड, किशोर धामणस्कर, गणेश कुलकर्णी,सुधीर अलगौडर, राम पाटील, विशाखा जितकर, लीना गाला, मनीष गाला, शर्वरी जोग, स्नेहल पंडित, प्रसाद बुरांडे, नितीन कुलकर्णी, दिलीप पेडनेकर यासाहित तमाम रसिकश्रोते उपस्थित होते. मैफिलीचे संयोजन संजय जोग, शंकर नायडू, राजेंद्र चौगुले, प्रशांत जोशी यांनी केले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!