|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषदेवर धडकअंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषदेवर धडक 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध मागण्यांबाबत यापूर्वी अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. शासनाने अंगण्वाडी सेविका व मदतनीस यांना मानधन वाढ देण्याबाबत समिती स्थापन केली आहे. मात्र या समितीचे कामकाज अत्यंत संथ गतीने सुरु आहे. याच्या निषेधार्थ 1 एप्रिलपासून संपूर्ण राज्यातील अंगण्वाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील अंगण्वाडी सेविका व मदतनीस सहभागी होणार आहेत. शासनाने मागण्यांबाबत वारंवार खोटी आश्वासने दिली आहेत. याचा निषेध करण्यासाठी आणि मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना दिले.

टाऊन हॉल बागेतून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा थेट जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारापर्यंत आल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱयांनी घोषणा देत शासन आणि प्रशासनाचा निषेध केला. निवेदनातील मागण्या अशा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना किमान वेतन म्हणून दरमहा 18 हजार रूपये वेतन द्यावे. सेवा निवृत्तीनंतर किमान दरमहा 3 हजार रूपये पेन्शन द्यावी. मदतनीसांचे मानधन हे अंगणवाडी सेविकांच्या 50 टक्के आहे. त्यामध्ये वाढ करून ते किमान 75 टक्के इतके करावे. खासगी बालवाडय़ा बंद कराव्या. केंद्र शासनाने सेविका व मदतनीसांच्या मानधनात दूप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. ज्या अंगणवाडय़ांना स्वतंत्र इामारती नाहीत, त्यांना ताबडतोब बांधून मिळाव्यात. अंगणवाडी कर्मचाऱयांना महिला व बाल विकास खात्याच्या कामा व्यतिरिक्त शासनाच्या अन्य विभ्घगाकडून कामे देण्यात आल्यास त्या संबंधित विभागाने अंगणवाडी सेविकांना प्रतिदिन 200 रूपये द्यावे, व मदतनीसांना 150 रूपये द्यावे. अंगणवालडी सेविकांना दरमहा 5 तारखेला वेतन द्यावे. टि.एच.आर बंद करून लाभाथ्यांना खाण्यायोग्य ताजा व शिजवलेला आहार द्यावा. अंगणवाडीचे साहित्य केंद्रावर पोहोच करावे, अंगणवाडी सेविकांना वैद्यकीय उपचार व वैद्यकीय रजा द्याव्या. मासिक व इतर मिटींग शनिवारी घेऊ नयेत, आदी विविध मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे. आंदोलनामध्ये कॉ. आप्पा पाटील, जयश्री पाटील, सरिता कंदले आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा समावेश होता.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!