|Friday, June 23, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » डॉक्टरांचे बेमुदत काम बंद; अत्यावश्यक सेवा सुरु



डॉक्टरांचे बेमुदत काम बंद; अत्यावश्यक सेवा सुरु 

वार्ताहर/ सोलापूर

डॉक्टरांवर सातत्याने होणारे हल्ले व निवासी डॉक्टरांना होणा-या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात शासकीय रूग्णालयातील 128 डॉक्टर सहभागी झाले असल्याची माहिती डॉक्टर संघटनेचे डॉ. पंकज नंदागवळी यांनी दिली. अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंद सुरु.

     या काम बंद आंदोलनात कोणत्याही रूग्णांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात येत असल्याची माहिती शासकीय रूग्णालयाचे अधि÷ाता डॉ. राजाराम पोवार यांनी दिली. डॉक्टर संपावर गेल्याने शासकीय रूग्णालयात रूग्णांचे हाल झाले मात्र अत्यावश्यक सेवेमुळे रूग्णांना दिलासा मिळाला.

     राज्यातील निवासी डॉक्टरांना होणा-या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. सायन रुग्णालयात शनिवारी रात्री सुरक्षारक्षकांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टर रोहित कुमार यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणाचा विरोध दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत बंद आ?दोलनाचे हत्यार उपसले आहे.

 

     निवासी डॉक्टरा?च्या सुरक्षेत वाढ करावी, डॉक्टर प्रोटेक्शन कायदा कडक करावा, डॉक्टरा?वर होणारे हल्ल्यांचे दाखल झालेले केसेस फास्ट ट्रक कोर्टात चालवावेत, राज्यात आतापर्यंत ?? केसेस दाखल झाले आहेत मात्र तपास रखडला आहे? तो त्वरीत करून संबंधिता?वर कारवाई व्हावी यासह आदी मागण्या?बाबत निवासी डॉक्टरा?नी संप पुकारला आहे?.

Related posts: