|Friday, August 4, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाळू ठेकेदारांवरील बोजे उतरवणारांचे निलंबन करावाळू ठेकेदारांवरील बोजे उतरवणारांचे निलंबन करा 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

अनाधिकृत वाळू उपसा व साठा करणाऱया ठेकेदारांच्या मालमत्तांवर चढवलेले बोजे शासन आदेश नसताना ते काही अधिकाऱयांनी उतरवले. संबंधीत अधिकाऱयांना निलंबीत करण्याचे आदेश महसूलच्या वरीष्ठ अधिकाऱयांना कृषी व पनण राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. तसेच अनाधिकृत वाळू साठे करणाऱयांवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना केल्या. पेयजल योजनेतील अफरा-तफरीच्या मुद्यांवरही खोत यांनी कडक कारवाईचे आदेश दिले.

खोत यांनी येथील राजरामबापू नाटय़गृहात तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व विभागांनी आढावा सादर केला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी.जी. पाटील यांनी अनाधिकृत वाळू उपसा, साठे तसेच कृषी विभागातील कामे झाली नसताना, निधी खर्ची पडल्याची तक्रार केली. पाटील म्हणाले, वाळू संदर्भात मी बोलतो म्हणून मला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. जर मला मारुन प्रश्न मार्गी लागणार असतील तर मला मारा पण प्रश्न सोडवा असे सांगितले. यावर मंत्री खोत यांनी वाळू प्रश्नी कुणाचीही गय करु नका, अशी सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱयांना दिले.

दरम्यान महाराष्ट्र विद्युत कंपनीचे आर.डी. चव्हाण व शेख या अधिकाऱयांना विभागाचा आढावा दिला. घरगुती कनेक्शनची कामे सुरु असून 85 ग्राहकांना कनेक्शन दिली आहेत. धोकादायक विद्युत तारांची कामे 60 टक्के पूर्ण झाली आहेत. 735 गावांमधून 935 कोटी वार्षीक महसूल आहे. घरगुती वीज कनेक्शनची थकबाकी 11 कोटी 43 लाख तर कृषी पंपाच्या कनेक्शनची 332 कोटी व पाणीपुरवठय़ाकडील 33 कोटी 74 लाख इतकी थकबाकी आहे. तसेच जिह्यात 450 जागा रिक्त असल्याचे सांगितले. यावेळी बी.जी. पाटील यांनी शॉर्ट सर्किटने ऊसांचे व लोकांचे नुकसान झाले असून भरपाई अद्याप मिळाली नसल्याचे सांगितले. अधिकाऱयांनी अहवालानुसार व कागदपत्रांची पुर्तता झालेल्यांना भरपाई देत असल्याचे सांगितले. दरम्यान मंत्री खोत यांनी प्रस्तावाची यादी मला व संबंधीत अधिकाऱयांकडे देण्यास सांगितले. अहिरवाडी येथील शेतकऱयांनी ठिबक सिंचन केले आहे. त्या करता जास्त विजक्षमतेचा ट्रान्सफार्म बदलून देण्याची मागणी केली.

पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री खोत यांनी वाळवा तालुक्यातील नेर्ले गावासाठी उच्च दाबाच्या पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव खात्याकडे आल्याचे सांगितले. तसेच पाणी पुरवढा संदर्भात जिह्याची बैठक मंत्रालयात लावण्याचे आदेश संबंधीत विभागास दिले. पेठ चे जि.प. सदस्य जगन्नाथ माळी यांनी महादेववाडी गावास पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे सांगितले. मंत्री खोत यांनी इरिगेशनचे पाणी विरहीत टाकून गावास पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. व आडवे येणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. बाळासाहेब घेवदे यांनी पाणंद रस्त्याला मजूर उपलब्ध होत नसल्याने सांगितले. गौरव नायकवडी यांनी पुर्नवसन वसाहतींच्या समस्या मांडल्या, मुद्रासारख्या योजनांचे मेळावे घेऊन गरजुंना लाभ द्यावा, असे सांगितले. तसेच मायक्रोफायनान्स कंपनीकडून कर्जे घेतलेल्यांनी प्रांतांना भेटावे व अनाधिकृत रीत्या वसूली सुरु असेल तर कंपनीच्या संबंधीत अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान प्रा. एस. के. कुलकर्णी यांनी 2017-18 च्या अर्थसंकल्पाचे विवेचन केले.

यावेळी आ. शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले, जगन्नाथ माळी, जयराज पाटील, अरुण कांबळे, सुषमा नायकवडी, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार सविता लष्करे, मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांच्यासह तालुका व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी व सरपंच उपस्थित होते.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!