|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वडिलांकडून मुलीच्या पोटात सुरीने वारवडिलांकडून मुलीच्या पोटात सुरीने वार 

प्रतिनिधी / रत्नागिरी

टिव्हीचा आवाज वाढवल्याच्या रागातून स्वत:च्या मुलीच्या पोटात वडिलांनीच वार केल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र भरत भेंगले (चिंचखरी-तिसरीवाडी, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांचे नाव आहे. सायली जितेंद्र भेंगले (18) ही यात जखमी झाली आहे. मुलीची आई स्नेहा जितेंद्र भोंगले (40) यांनी या विषयीची फिर्याद दिली आहे.

यानुसार जितेंद्र भेंगले, स्नेहा भोंगले हे पती-पत्नी शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घरातील हॉलमध्ये टिव्ही बघत होते. यावेळी सायली तिथे आली. पिक्चर पाहण्यासाठी टिव्हीचा आवाज तिने वाढवला. याचा जितेंद्र भेंगले यांना राग आला. त्यांनी आपली मुलगी सायली हिला शिवीगाळ केली आणि घरात असलेली सुरी घेऊन या मुलीच्या डाव्या बाजूस पोटात मारून दुखापत केली, अशी तक्रार देण्यात आली आहे. मुलीवर येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वडिलांना या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविसं कलम 326, 324, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

किरकोळ कारणावरून कुटुंबात वादविवाद होऊन त्याला गंभीर वळण लागण्याचे प्रकार वरचेवर पुढे येत आहेत. यातच ही घटना पुढे आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहांचे वाढते प्रकार टळावेत, यासाठी कुटुंब व्यवस्थेच्या बळकटीकरणाची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!