|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेतर्फे गार्डन वाहनतळाचे उद्घाटन अथवा नामकरणपालिकेतर्फे गार्डन वाहनतळाचे उद्घाटन अथवा नामकरण 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

पालिकेच्या वतीने रे गार्डन वाहनतळाचे उद्घाटन अथवा नामकरण करण्यात आले नाही जनतेने नाकारलेल्या काही स्वार्थी मंडळी याप्रकरणी जनतेच्या भावना भडकावुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगरसेवक कुमार शिंदे यांनी केला असुन छत्रपती संभाजी महाराजांविषयी तुम्हाला प्रेम व आस्था होती तर तीन महिने तुमची सत्ता असताना नामकरणाचा ठराव का मंजुर करण्यात केला नाही, असा सवालही कुमार शिंदे यांनी केला. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.

वाहनतळाचे नामकरण या संदर्भात आपली भुमिका स्पष्ट करताना नगरसेवक कुमार शिंदे हे वार्ताहरांशी बोलत होते. पालिकेच्या सावत्रिक निवडणुकी पुर्वी आम्हा आठ नगरसेवकांना जिल्हाधिकाऱयांनी नगरसेवक पदासाठी अपात्र ठरविले होते. त्यामुळे सभागृहात 9 नगरसेवक हे साधारण तीन महिने सत्तेवर होते. तत्कालिन उपनगराध्यक्ष संतोष आखाडे यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणुन जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केली होती. या नगराध्यक्षांनी 27 डिसें 2016 रोजी पालिकेने बांधलेल्या रे गार्डन वाहनतळ व हिंदु स्मशानभुमीचे औपचारिक उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते. या सोहळयाचे आयोजन पालिकेच्या वतीने केले नव्हते. कारण 6 सप्टेंबर 2016 रोजी नगरसेवक डी. एम. बावळेकर अपर्णा सलागरे व लक्ष्मण कोंढाळकर यांनी अर्धवट विकासकामांचे उद्घाटन करू नये असा तक्रारी अर्ज पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिला होता. तरी देखील शहरातील काही विघ्नसंतोषी मंडळी या प्रकरणाचे राजकीय भांडवल करून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करीत आहेत. आम्ही कोणाच्याही भावना दुखवू इच्छित नाही आम्ही सर्वधर्मियांचा आदर करतो. मात्र काही मंडळी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी शहरात सहय़ांची मोहिम राबवित आहेत. या सहय़ांचे पत्रक पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांना देवुन सर्वसामान्य महाबळेश्वरकरांच्या भावना भडकविण्याचे काम करीत आहेत. जर यांना छ संभाजी महाराजांबाबत आदर व प्रेम आहे तर मग त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत वाहनतळाच्या नामकरणाचा ठराव का केला नाही. 

छ संभाजी महाराजां बद्द्ल आम्हाला नितांत आदर आहे. या चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असुन या पुतळयाजवळच पालिकेचे वाहनतळ असल्याने या वाहनतळाला आंबेडकरांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार पालिकेने या वाहनतळास आंबेडकरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कायमच लोकभावना लक्षात घेवुन कारभार करीत असतो. त्यामुळेच आमच्या काळात पंचायत समिती चौकास हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक असे नाव दिले आहे।. माखरिया उद्यानाजवळ असलेल्या चौकाला महात्मा बसवेश्वर असे तर खिंडीतील चौकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात आहे. जनतेने नाकारलेली काही मंडळी आपापसात जातीय जेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या भुलथापांना कोणी बळी पडु नये असे आवाहनही कुमार शिंदे यांनी केले. 

सध्या तेथे जो फलक व कोनशिला आहे ती कोणी बसविली याबाबत काहीही माहित नसल्याचे कुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!