|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्रीकर सरकारचे खातेवाटप जाहीरपर्रीकर सरकारचे खातेवाटप जाहीर 

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पहिल्या टप्प्यात आपल्या 9 सहकारी मंत्र्यांना प्रत्येकी एक या प्रमाणे खात्यांचे वाटप काल सोमवारी दुपारी केले. स्वत:कडे गृह, अर्थ, सर्वसामान्य प्रशासन इत्यादी खाती ठेवली. सुदिनकडे सार्वजनिक बांधकाम, विजयकडे नगरनियोजन, फ्रान्सिस डिसोझाकडे नगरविकास, बाबु-पर्यटन, रोहन-महसूल, मडकईकर-वीज, गोविंद गावडे-कला व संस्कृती, विनोद पालयेकर-जलस्रोत तर जयेश साळगावकर-गृहनिर्माण अशी खाती देण्यात आलेली आहेत.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी मंत्रालयात आपल्या नवनियुक्त मंत्र्यांबरोबर चर्चा केली. सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई वगळता इतर सर्वजण उपस्थित होते. दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान बहुतेक मंत्र्यांनी आपापली केबिन्स ताब्यात घेतली आणि मंत्री म्हणून कामकाज हाताळण्यास प्रारंभ केला. मुख्यमंत्र्यांनी सगळय़ा मंत्र्यांना प्रत्येक एकेका खात्याचे वाटप केले. या संदर्भाची फाईल सकाळीच राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली. त्यांनी मान्यता दिल्यानंतर दुपारी आदेश जारी करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी जे वाटप केले ते पहिल्या टप्प्यातले असून दुसऱया टप्प्यात अर्थसंकल्प पेश झाल्यानंतर व मंत्रिमडळात दोन मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतरच खातेवाटप केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी वाहतूक, वन ही खाती आपल्याजवळ ठेवलेली आहेत. प्रत्येक मंत्र्याकडे तीन खाती जाणार आहेत, मात्र त्यांचे वितरण होण्यासाठी आणखी काही दिवस जातील.

मुख्यमंत्र्यांनी केलेले खातेवाटप

1. मनोहर पर्रीकर (मुख्यमंत्री)गृह, अर्थ, कार्मिक, सर्वसामान्य
प्रशासन, दक्षता, वाहतूक (व अन्य जी इतरांना दिलेली नाहीत ती सर्व खाती)
2. रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकरसार्वजनिक बांधकाम
3. विजय सरदेसाईनगर आणि नियोजन
4. फ्रान्सिस डिसोझानगरविकास
5. मनोहर आजगावकरपर्यटन
6. रोहन खंवटेमहसूल
7. पांडुरंग मडकईकरवीज
8. गोविंद गावडेकला व संस्कृती
9. विनोद पालयेकरजलस्रोत
10. जयेश साळगावकरगृहनिर्माण

 

पुढील आठवडय़ात नव्या मंत्र्यांचा शपथविधी

उपलब्ध माहितीनुसार आणखी दोन मंत्र्यांचा शपथविधी पुढील आठवडय़ात होईल. माविन गुदिन्हो आणि मायकल लोबो या दोघांना मंत्रिपदे देण्यात येणार असून विश्वजित राणे यांना मंत्रीपद दिले तर भाजपमध्ये संघर्ष होणार असल्याची शक्यता गृहीत धरून या दोघांना मंत्रीपदे देण्याबाबत चर्चा सुरु आहे. ही मंत्रीपदे निश्चित करून शपथविधी झाल्यानंतर इतर खात्यांचे वाटप मुख्यमंत्री करणार आहेत. बाबू आजगावकर यांना क्रीडा, जयेश साळगावकर यांना ग्रामीण विकास यंत्रणा तसेच बंदरे, पालयेकर यांना नागरिपुरवठा, सुदिन ढवळीकर यांना वाहतूक, रोहन खंवटे यांना वन अशा पद्धतीने खात्यांचे वाटप होईल, असा अंदाज आहे.

मंत्र्यांनी घेतला केबिनचा ताबा

फ्रान्सिस डिसोझा यांनी आपले केबिन सोडले नाही. त्याचबरोबर सुदिन ढवळीकर यांनी देखील दुसऱया मजल्यावरील आपले कार्यालय जैसे थे ठेवले. मागील सरकारमधील हे दोनच मंत्री. बाकी सर्व नवे चेहरे आहेत. बाबू आजगावकर यांनी दीपक ढवळीकर यांचे केबिन मिळविले तर विनोद पालयेकर यांनी आवेर्तान फुर्तादो यांचे केबिन मिळविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या केबिनच्या बाजूलाच असलेल्या आणि गेली 10 वर्षे एनआरआयसाठी राखीव ठेवलेल्या केबिनचा ताबा रोहन खंवटे यांनी घेतला आहे. नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी राजेंद्र आर्लेकर यांच्या केबिनचा ताबा घेतला. जयेश साळगावकर यांनी माजी उद्योगमंत्री महादेव नाईक यांच्या केबिनचा ताबा घेतला. पांडुरंग मडकईकर यांनी दिलीप परुळेकर यांचे केबिन पटकावले.

दरम्यान, तिसऱया मजल्यावर दोन केबिन्स रिक्त आहेत. दुसऱया मजल्यावरील मांद्रेकर यांचे केबिन अद्याप कुणीही घेतलेले नाही.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!