|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » श्रीराम सेनेच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांवर कारवाई कराश्रीराम सेनेच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांवर कारवाई करा 

20di-26

प्रतिनिधी / बेळगाव

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी अक्काताई सुतार यांना मारहाण केली आहे. याबाबत मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पण अद्याप त्यांना अटक झाली नाही. यामुळे महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संबंधितांना अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

श्रीराम सेनेच्या नंदू इंदुलकर आणि परशराम देसाई यांनी मला मारहाण केल्याचे या निवेदनात म्हटले आहे. श्रीराम सेनेचे कार्यकर्ते अशा प्रकारे अनेकवेळा महिलांना व इतरांना धमकी देत आहेत. असे असताना पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाहीत. तेव्हा आता तुम्हीच याबाबत पाऊल उचला व संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

शनिवार दि. 18 रोजी ही घटना घडली. त्यानंतर मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविण्यात आली. पण पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नाही. यामुळे  महिलांवर हा अन्याय आहे. तेव्हा तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अप्परजिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शालिनी पाटील, मिलन पवार, शिल्पा केकरे, प्रिती भोसले, छाया भातकांडे, सुजाता पवार, भावना पवार, अमृता कारेकर, कविता हुंदरे, मिना हुंदरे, मिरा मिरजकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Related posts: