|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » सिद्धूंचा रिऍलिटी शोमधील सहभाग होणार बंद ?

सिद्धूंचा रिऍलिटी शोमधील सहभाग होणार बंद ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

‘द कपिल शर्मा शो’मध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सहभागी होत असलेले नवज्योतसिंह सिद्धू यांचा या शोमधील सहभाग बंद होण्याची शक्यता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी सिद्धू यांना शोमधील सहभागाबाबत अटर्नी जनरल यांच्याकडे सल्ला घेण्याचे सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून नवज्योतसिंह सिद्धू हे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सहभागी होत आहेत. पण सिद्धू हे आता मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी झालेले आहेत. मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सिद्धू यांनी आपण दिवसा मंत्रिपदाची कामे करु आणि रात्री शुटिंग करण्याचे बोलून दाखवले. त्यामुळे एखाद्या मंत्र्याने अशा प्रकारच्या रिऍलिटी शोमध्ये उपस्थित राहणे कितपत योग्य आहे, याबाबत ऍटर्नी जनरल यांचे मत घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा, असे अमरिंदरसिंह यांनी सांगितले.