|Saturday, February 22, 2020
You are here: Home » भविष्य » श्रीराम रक्षा स्तोत्र संकटनाशासाठी रामबाण

श्रीराम रक्षा स्तोत्र संकटनाशासाठी रामबाण 

भाग -2

बुध. 22 ते 28 मार्च 2017

रामरक्षा स्तोत्र व भीमरूपी महारुद्रा अथवा हनुमान चालीसा स्तोत्र कसे वाचावे याच्या काही पद्धती आहेत व त्या स्तोत्रातच त्याचे स्पष्टीकरण आहे. त्यानुसार वाचल्यास ही दोन्ही स्तोत्रे तात्काळ फलदायी होतात. उदाहरणच द्यायचे झाले तर भीमरुपी स्तोत्राचे देता येईल. त्या स्तोत्रात शेवटी काय म्हटलेले आहे हे धरा पंधरा श्लोकी शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्र कळागुणे… याचा अर्थ किती लोकांना माहीत आहे. सांगता येणार नाही. मनात काहीही संदेश अथवा संशय न ठेवता चंद्राच्या कलेप्रमाणे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत व पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत कसे वाचावे म्हणजे त्याचा त्वरित अनुभव येतो हे त्या स्तोत्रातच स्पष्ट केलेले आहे. रामरक्षेतही शेवटी सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने असा शब्द आहे. विष्णू सहस्त्रनामाच्या तोडीस तोड असे हे रामरक्षा स्तोत्र आहे. ते वाचताना पूर्ण अर्थासह एकदा वाचावे व मगच त्याची पारायणे करावीत नंतर मारुती स्तोत्र पुन्हा वाचावे. रामरक्षा स्तोत्र जगदवंद्य बुध कौशिक ऋषीनी रचलेले आहे कुणा येरागबाळाने  रचलेले नाही याची जाण ठेवावी. अत्यंत प्रभावी असे हे स्तोत्र आहे. त्यातील प्रत्येक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. आर्थिक अडचणी शत्रुपीडा वास्तुदोष, कुलदेवतेची अवकृपा करणीबाधा यासह हजारो दोषावर रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आहे. हल्ली सर्वत्र क्रिकेट व इतर खेळांचे वारे जोरात सुरू आहे. शरीर स्वास्थ्याला खेळ हे आवश्यक आहेत यात दुमत नाही पण खेळातच करीयर करतो असे सांगून काही महाविद्यालयीन खेळ हे आवश्यक आहेत यात दुमत नाही पण खेळातच करियर करतो असे सांगून काही महाविद्यालयीन तरुण कॉलेज सोडून खेळाकडे लक्ष देत आहेत. आवड म्हणून खेळ खेळण्यास हरकत नसावी पण इंजिनियरिंग मेडीकल वकिली सॉफ्टवेअर यासारखे शिक्षण सोडून फक्त खेळाकडे लक्ष देणे व त्यातच करियर करतो म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे ठरते. मुलाला क्रिकेटची आवड पण परिस्थितीमुळे त्याला क्रिकेटचे महागडे साहित्य विकत घेता येत नाही. म्हणून खिन्न झालेल्या एका मातेने आपले शील विकून त्याला क्रिकेटचे साहित्य दिले असे एका टीव्ही मालिकेत दाखवलेले आहे. यावरून हा खेळ किती भयानक परिस्थिती निर्माण करू शकतो याची कल्पना येईल काही क्रिडापटू, क्रिकेटपटू अथवा चित्रपट क्षेत्रातील नामवंत नटनटय़ा निवृत्त झाल्यावर त्यांना कुणीही विचारत नाहीत. क्रीडाक्षेत्राच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार केले तरी खपतात असा विचार तरुण पिढी करीत असते. काही लोक व्यसनमुक्ती वा इतर कारणाखाली काश्मीर ते कन्या कुमारी सायकल प्रवास तसेच इतरही निरर्थक उपक्रम करून गिनीज बुकात नाव नोंदविणार असे म्हणतात ज्यांना पोटासाठी राबावे लागते कष्टाची किमत असते कष्ट करून वर येण्याची तळमळ असते असे लोक अशा रिकामटेकडय़ा फंदात पडत नाहीत व अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱया काही संस्थांनीही याचा विचार केला पाहिजे. माता पित्यानीदेखील मुलांना जिवनावश्यक क्षेत्रातच करीयर करण्यास सांगावे ते त्यांना पुढील जीवनाच्या दृष्टीने चांगले ठरेल. रामनवमीला जर सतत रामरक्षा स्तोत्राचे व हनुमान जयंतीला जर मारुतीच्या कोणत्याही स्तोत्राचे वाचन केले तर लक्ष्मी व अन्नपूर्णा देवीही प्रसन्न होते. बिघडलेले मुले योग्य मार्गावर येतात. त्यांना करीयरच्या दृष्टीने योग्य मार्ग दिसतो पण फक्त देवदेव करून काही मिळणार नाही. प्रयत्नही हवेतच हे विसरु नये.

 

मेष

कौटुंबिक वादविवाद, संघर्ष यापासून दूर रहा. रागावर नियंत्रण ठेवा. शेअर मार्केट व स्टॉक मार्केट यामध्ये गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. मित्र मैत्रिणीचा सहवास व त्यांच्यासाठी खर्चही करावा लागेल. आरोग्याच्या काही ना काही तक्रारी उदभवतील. अपुरी राहिलेली कामे रामनवमी नंतर प्रयत्न करून पार पाडा. रामरक्षा किंवा हनुमानाचे कोणतेही स्तोत्र रामनवमी व हनुमान जयंती दिवशी वाचावे.


वृषभ

आवडत्या व्यक्तिची अचानक भेट होईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. थोरा मोठय़ांच्या आशीर्वादानेच पुढे जा. डोळय़ांची व डोक्मयाची विशेष काळजी घ्या. नोकरी व्यवसायात असाल तर शत्रंtच्या कारवाया सुरू होतील. त्यासाठी हनुमान किंवा रामरक्षा पठण करणे. वाहन चालविताना पूर्णपणे चेक करून मगच वाहन सावधगिरीने चालवा. अपचन व गॅसेस यांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. अचानक बदली बढतीचे योग संभवतात. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळू शकेल.


मिथुन

आतापर्यंत जीवनामध्ये तुम्ही जितका संघर्ष केलेला आहे त्याचे शुभफल निश्चितच मिळू लागेल. बाहेरच्या लोकांशी अथवा कुटुंबाशी बोलण्यात गोडवा ठेवा. चरकट खाणे सोडून संतुलीत आहाराकडे लक्ष द्या. वैचारिक मतभेद टाळा. पत्निच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. वायफळ खर्च करण्यापेक्षा पैसा राखून ठेवण्याकडे विशेष लक्ष द्या. कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. कोठेही गुंतवणूक करताना चार चौघांचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या. रामनवमी व हनुमानजयंती दिवशी रामरक्षा व हनुमानाचे पठण करा. निश्चित फायदा होईल.


कर्क

नोकरीत ताणतणाव व कामाचा बोजा वाढेल. आर्थिक व्यवहार करताना कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. कोणाकडून पैसे अथवा कर्ज घेतले असल्यास ते फेडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा कौटुंबिक त्रासाला सामोरे जावे लागेल. भागिदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर व्यवहार सुरळीत ठेवा. विवाहासाठी उत्तम काळ आहे. कोणी तरी केलेली चूक तुमच्या अंगलट येणार नाही. याची काळजी घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या. नवीन वस्तू खरेदी कराल. व्यवसायात चढउतार होण्याची शक्मयता त्यासाठी देवाचे वाचन ठेवा.


सिंह

व्यसनी मित्रापासून व व्यसनापासून दूर रहा. जीवनात बरेच काही साध्य करू शकाल. एखादा नवा व्यवसाय सुरू करणार असाल तर कोठून ना कोठून मदत मिळून आर्थिक भार लागेल. आई व वडिलांचे मन दुखू नका. तसेच भावंडाची काळजी घ्या. वरि÷ांची मर्जी तुमच्यावर राहिल. कागदोपत्री कोणतेही व्यवहार करताना व सही करताना निट वाचून, पडताळून मगच करा. दररोज  सूर्याला अर्ध्य देऊन बाहेर पडा. विनासायास कामे होतील. अति चरबीयुक्त खाणे टाळा. रामरक्षा स्तोत्राचे पठण करा.


कन्या

कुटुंबात अचानक वादविवाद सुरू होतील व त्याचे पर्यावसान मोठय़ा भांडणात होणार नाही याची काळजी घ्या. थोरा मोठय़ांची मने दुखवू नका. कामाच्या अति ताणतणावामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्मयता आहे. त्यासाठी संतुलीत आहाराकडे विशेष लक्ष द्या. आर्थिक व्यवहारात कोणालाही फसवू नका. अन्यथा त्याचा फटका आपणास नंतर जाणवेल. दूरचे प्रवास टाळा व खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यात तुमची मदत मोलाची राहिल. तुम्ही कोणालाही मदत केलेल्याचे श्रेय कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अचानक मिळेल. रामरक्षा अथवा हनुमानाचे स्तोत्र वाचनात ठेवावे.


तुळ

अचानक संकट आले असेल, गुप्त शत्रुपीडा असेल, आर्थिक अडचणीने बेजार झाला असाल. तुमच्याविरुद्ध खोटय़ा नाटय़ा कंडय़ा पिकविल्या असतील समोर गोड बोलून मागे टोमणे मारणे, नोकरी व्यवसायातील अडचणी, नोकरी हातची गेली असेल, व्यवसायात त्रास होत असेल तर येत्या रामनवमीला रामरक्षा व हनुमान जयंतीला स्वामी समर्थाचे मारुती स्तोत्राचे चांद्रमान पद्धतीने वाचन करा. त्याचा चांगला अनुभव येईल.


वृश्चिक

साडेसातीमुळे बेजार झाला असाल, शत्रुत्व वाढलेले असेल, पती पत्नीत बेबनाव आर्थिक अडचणी, गुप्त शत्रुत्व, हानी, बदनामी असे प्रकार घडत असतील तर रामनवमीला रामरक्षा अथवा रामचरित मानस तसेच हनुमान जयंतीला मारुतीचे कोणतेही स्तोत्र जास्तीत जास्त वेळा वाचावे. धनलाभ व प्रवासाच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे. मनातील अनेक गोष्टी साध्य होतील.


धनु

निष्कारण गैरसमज आर्थिक समस्या शारीरिक व मानसिक आजार एखादे मोठे ऑपरेशन होण्याची शक्मयता असेल. घरात नको असलेल्या व्यक्ती येणे, जीवावरचे संकट, मानहानी व तत्सम प्रकार घडत असतील तर रामनवमीला रामरक्षेचे पाठ व हनुमान जयंतीला मारुतीचे समर्थरचित कोणतेही स्तोत्र वाचावे, बरीच संकटे टळतील.


मकर

आर्थिक समस्या वैवाहिक जीवनातील अडचणी,गैरसमज शत्रुत्व, कर्जावू दिलेले पैसे अडकले असतील. प्रति÷sला धोका पोचला असेल पैस टिकत नसेल. विवाहातील अडचणी असे प्रकार घडत असतील. मानसिक शांती नसेल तर येत्या हनुमान जयंतीपासून मारुतीचे कोणतेही स्तोत्र वाचावे. बरच फरक पडेल.


कुंभ

गुप्त शत्रुत्व, आर्थिक अडचणी, शारीरीक व्याधी, मानसिक त्रास, ताणतणाव, शत्रुपीडा, पती पत्नीतील मतभेद, नोकरी व्यवसायातील अडचणी,  संततीबाबतच्या समस्या असे प्रकार घडत असतील तर रामनवमीला रामरक्षा व हनुमान जयंतीपासून 21 दिवस रोज मारुतीचे कोणतेही स्तोत्र वाचण्यास सुरुवात करा. अनेक समस्यातून बचाव होईल.


मीन

मंगळ अथवा तत्सम कारणामुळे लग्नात येणारे अडथळे, शारीरिक व्याधी आजूबाजूच्या लोकापासून होणारा त्रास मनस्पात गुप्त शत्रुत्व, आर्थिक अडचणी, अनारोग्य, गैरसमज, कोर्टकचेऱयांचे प्रसंग, व्यवसायाची महत्त्वाची संधी हातची गेली असेल तर रामनवमीला रामरक्षा व हनुमान जयंतीला मारुतीचे कोणतेही स्तोत्र जास्तीत जास्त वेळा वाचावे. सामूहिकरित्या वाचन केल्यास त्याचा अतिशय सुरेख अनुभव येईल.


 

Related posts: