|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तामिळनाडूत भाजप उमेदवाराला मिळाली रजनीकांतची साथ

तामिळनाडूत भाजप उमेदवाराला मिळाली रजनीकांतची साथ 

चेन्नई :

 तमिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांनी दिवंगत जयललिता यांच्या मतदारसंघात होणाऱया पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवाराला भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. या मतदारसंघात 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी भाजपने संगीतकार गंगे अमरन यांना उमेदवारी दिली आहे. प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांचे बंधू असणारे अमरन यांची रजनीकांत यांनी आपल्या निवासस्थानी भेट घेतली. रजनीकांत यांचे निवासस्थान जयललितांचे निवासस्थान ‘वेदा निलयम’च्या नजीकच आहे. जयललितांचे 5 डिसेंबर रोजी आजारपणामुळे निधन झाले होते. रजनीकांत यांनीच आपल्याला भेटीचे आमंत्रण दिले होते असा दावा भाजप उमेदवाराने केला आहे. रजनीकांत भाजपप्रवेश करू शकतात अशी चर्चा सुरू असताना या भेटीचे महत्त्व आणखीनच वाढते. रजनीकांत यांच्या प्रतिमेचा लाभ घेत भाजप या दक्षिणेच्या अत्यंत महत्त्वाच्या राज्यात हातपाय पसरू इच्छितो.

 हे लपून राहिलेले नाही.

Related posts: