|Thursday, October 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कृष्णांचा आज भाजपमध्ये प्रवेश

कृष्णांचा आज भाजपमध्ये प्रवेश 

प्रतिनिधी / बेंगळूर

माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या भाजप प्रवेश काही कारणासाठी लांबणीवर पडला होता. आता कृष्णांनी बुधवार दि. 22 मार्च रोजी भाजप पक्षात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली येथे पार पडणाऱया कार्यक्रमात ते पक्षात दाखल होणार आहेत.

याविषयी प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी आपण म्हैसुरातील पोटनिवडणूक प्रचारामध्ये व्यस्त असल्याने बुधवारी नवी दिल्ली होणाऱया कृष्णांच्या भाजप प्रवेशावेळी उपस्थित राहणे शक्य नाही. आगामी दिवसात भव्य समारंभ आयोजित करून त्यांचे स्वागत करण्यात येईल.

बेंगळूरमध्ये कृष्णा यांच्या भगिनी सुनिता यांचे 14 मार्च रोजी निधन झाल्याने 15 मार्च रोजीचा भाजप प्रवेशाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता 22 मार्चला ते भाजपात दाखल होणार आहेत. यापूर्वी येडियुराप्पांनी कृष्णांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अधिकृतपणे पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले होते.

 

Related posts: