|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगली कारागृहावर सीसीटीव्हीचा वॉच , जिल्हा नियोजन समितीमधून 22 लाखांचा निधी

सांगली कारागृहावर सीसीटीव्हीचा वॉच , जिल्हा नियोजन समितीमधून 22 लाखांचा निधी 

प्रतिनिधी/ सांगली

  सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून सीसीटीव्ही कॅमेऱयासाठी 22 लाखांचा निधी मंजूर केला असल्याने कारागृहात सीसीटीव्ही बसवण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. कारागृहाचे प्रवेशव्दार,कारागृह अधिक्षक,दवाखान्यापासून ते केद्यांच्या बरॅकीपर्यंत सर्वत्र सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.  त्यामुळे कैदयांच्या गर्दीने तुडूंब भरलेल्या कत क्षमतेपेक्षा जास्त कैदी असण्याची बाब नवी नाही. कारागृह प्रशासन आणि कारागृहाच्या सुरक्षेसाठीचा प्रशासनावरील ताण कमी होणार आहे. तरीही जागेचा प्रश्न कायम आहे.

  कारागृहातील कैद्यांची संख्या आणि अपुरी जागा यामुळे कारागृहात सीसीटीव्ही बसवण्यासाठी कारागृह प्रशासनाची अनेक दिवसांपासून मागणी होती. बऱयाच वेळा कारागृहात कैद्यांमधील वाद अथवा अन्य प्रश्नासाठी बेकसुर कर्मचारी आणि अधिकाऱयांना जबाबदार धरण्यात येते. त्याचबरोबर कैद्यांची गर्दी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वावर नजर ठेवणे कर्मचाऱयांना कठीण होत असे. त्यामुळे बाहेरून कारागृहात नशील्या पदार्थाच्या पुडया फेकणे, तंबाखू अथवा तत्सम वस्तु फेकणे असे प्रकार यापुर्वी अनेक वेळा उघडकीस आले आहेत. असे प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची तात्पुरती चौकशी आणि चर्चा होत असे. त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था कारागृह प्रशासनाची सुरू होती.

 यावर उपाय म्हणून कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी नाविन्यपुर्ण योजेनतून सीसीटीव्हीसाठी कॅमेऱयांसाठी 22 लाखांचा निधी मंजूर केला. त्यातून चाळीस सीसीटीव्ही बसवण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.आणखी चार सीसटीव्ही ची मागणी करण्यात आली आहे. यामुळे आता कारागृह अधीक्षकांना केद्याबरोबरच कर्मचाऱयांवरही नजर ठेवता येणार आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रशासनावरील ताण कमी होणार असल्याने प्रशासनाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

                     कारागृहाच्या जागेचा प्रश्न कायम

  कारागृहात सीसीटीव्ही बसवण्यात आले असले तरी कारागृहाच्या जागेचा खप्रश्न कायम आहे. सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱया कारागृहात 205 पुरूष, आणि 30 महिला अशी केवळ 235 बंदी ठेवण्याची क्षमता आहे. पण कायमच क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतात. सरासरी  50 ते साठ कैदी क्षमतेपेक्षा जास्त असतात. खुन अथवा गँगवारसारख्या गुन्हयातील कैदय़ांची संख्या लक्षणीय नसते. गेल्या दोन तीन महिन्यात मात्र कारागृह प्रशासनाची चांगलीच झोप उडाली आहे. न्यायालयांनी जामीन नाकारलेले अनेक कैदी सांगली कारागृहात आहेत. पालीस तपास आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बाधक ठरणाऱया आरोपींना न्यायालयाने सहसा जामीन दिले नाहीत. पण सध्या चारशेच्या जवळपास भरलेल्या कारागृहात तब्बल 168 कैदी खुनाच्या गुन्हय़ातील आहेत. त्यामुळे कैदयांना सुविधा पुरवण्याबरोबरच त्यांच्यावर नजर ठेवताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडत आहे. गेल्या अनेक वर्षापासून चर्चेतील कारागृहाच्या जागेचा प्रलंबीत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कारागृहात 382 पुरूष आणि 14 महिला असे एकूण 382 कैदी आहेत. त्यामध्ये सश्रम कारावास झालेले 5, साध्या कैदेची शिक्षा भोगणारे पाच, स्थानबध्दतेच्या गुन्हयातील तीन आरोपी आहेत. तर तब्बल 168 कैदी हे खुनासारख्या गंभीर गुन्हयातील आहेत. त्यामुळे त्यांना सुविधा पुरवण्याबरोबरच त्यांच्यावर नजर ठेवताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे.  कारागृहातील जागा अपुरी पडत असल्याचे एकाच बऱयाकीत दोन ते तीन रांगात  कैद्यांना झोपवण्याची वेळ येते. त्यामुळे त्यांच्यात ठराविक अंतर राखणे दुरच पण एकमेकांना खेटून झोपण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नसतो.

यामुळे कारागृह प्रशासन सध्या चांगलेच तणावाखाली असल्याचे चित्र आहे. सांगली कारागृह मध्यवर्ती ठिकाणी येत असल्याने सुरक्षेचा मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कारागृह प्रशासनाने शहराच्या बाहेर प्रशस्त जागेची केलेली मागणी अद्याप लाल फितीत आणि सरकारी गतीत पुढे जाण्यास तयार नाही. कारागृहाच्या भिंतीला लागूनच नागरी वस्ती असल्याने अनेक वेळा वादाचे मुद्दे उद्भभवले आहेत. तरीही शासन गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्याऐवजी शासनाने कारागृहाच्या जागेचा प्रश्न लवकर निकालात मागणी होत आहे.

यासाठी भाजपाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी आजपर्यंत शासन दरबारी अनेक तक्रारी केल्या आहेत. मध्यवर्ती वस्तीमधून कारागृह शहराबाहेर हलवण्याची मागणी त्यांनी केली आहे. जागेसाठीचा प्रस्ताव अनेक वर्षापासून शासन दरबारी पडून आहे. त्याला गती देण्याची गरज आहे.

Related posts: