|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विश्वजीत राणे विरोधात कॉंग्रेसची अपात्रता याचिका

विश्वजीत राणे विरोधात कॉंग्रेसची अपात्रता याचिका 

प्रतिनिधी/ पणजी

आमदारकीचा राजिनामा दिलेले काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. आज विधानसभेत सभापतींची निवड झाल्यानंतर याचिका दाखल करण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे.

पर्रीकर सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावलेल्या एक दिवशीय बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावलेल्या एकदिवशीय विधानसभा अधिवेशनावेळी मतदान घेण्यात आले. या मतदानाच्या प्रक्रीयेवेळी विश्वजित राणे सभागृहात उपस्थित राहिले नाही. बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रीया सुरू होण्याअगोदर विश्वजित राणे यांनी सभागृह सोडले. एवढेच नव्हे तर अवघ्या काही तासातच त्यानी आमदारकीचा राजिनामा दिला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र शिश्वजित यांच्या कृतीमुळे काँग्रेस नेते प्रचंड नाराज बनले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे केंद्रीय नेतेही बरेच नाराज झाले आहेत.

केंद्रीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्रीकरांनी विधानसभेत बहुमताचा ठराव मांडल्यानंतर त्याविरोधात मतदान करण्याबाबत काँग्रेसने व्हीप जारी केला होता. हा व्हीप धुडकावून विश्वजित राणे यांनी सभागृह सोडले. व्हीप धुडकावण्याची कृती अपात्रतेसाठी पुरेशी असल्याचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाबु कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चर्चिल अपक्षांशीही संपर्क साधाणार

काँग्रेस पक्षाचे सभापती पदाचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड निश्चितपणे निवडून येतील व त्यासाठी अपक्ष आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्याशीही बोलणी करणार असल्याचे बाबु कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. जनतेने भाजपच्या विरोधात कौल दिलेला आहे. त्याना सभा स्थापण्याच्या अधिकाराच नव्हता. पण भाजपने घोडेबाजार करून सत्ता स्थापन केली. सभापतीपदासाठी काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला आहे. त्याची निवड होणार असल्याचेही ते म्हणाले. भाजप सत्तेवर येऊ नये असे त्याना वाटत होते. त्यानी आपल्याला मतदान करावे असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.

Related posts: