|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुढील महिन्यात पुन्हा आचार संहिता

पुढील महिन्यात पुन्हा आचार संहिता 

प्रतिनिधी / पणजी

पुढील महिन्यात राज्यात पुन्हा एकदा आचार संहिता लागू होणार असल्याने, त्यामुळे विकासकामे पुन्हा एकदा ठप्प होतील.

राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला 5 जानेवारी रोजी एक स्मरणपत्र पाठवून 21 मे रोजी पंचायत निवडणुका घेण्यात याव्यात, असे कळविलेले होते. राज्यातील 189 ग्रामपंचायतींची मुदत 27 मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे 21 मे ही निवडणूक तारीख निवडणूक आयोगाने निश्चित केलेली आहे. याकरिता 20 एप्रिलपासून राज्यात आचार संहिता राज्य निवडणूक आयोग लागू करणार आहे.

गोव्यात आता नवे पर्रीकर सरकार आल्याने या सरकारने त्याकरिता निर्णय घेणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार पंचायत निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत. त्यामुळे फारतर आणखी दोन चार दिवसांच्या फरकाने निवडणुका घेता येतील, पण निवडणूक पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारकडे कोणतेही कारण आता शिल्लक नाही.

निवडणुकीची पूर्वतयारी सुरु

राज्य निवडणूक आयोगाने पंचायत संचालकांना प्रभागांची पुनर्रचना व इतर आवश्यक कामे हाती घेण्यास सांगितलेले आहे. त्यानुसार पंचायत संचालकांनी सर्व गटविकास अधिकाऱयांना मामलेदारांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यास सांगितलेले आहे. 31 मार्चपर्यंत हे काम पूर्ण होण्याची गरज आहे. सध्यातरी नव्या सरकारने पंचायत निवडणुकीच्या बाबतीत आपला निर्णय जाहीर केलेला नसल्याने पंचायत निवडणुका 21 मे रोजी होतील, असे गृहीत धरुन राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी आवश्यक कामे सुरु केली आहेत.

Related posts: