|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लक्ष विचलित करून 80 वषीय वृद्धेची फसवणूक

लक्ष विचलित करून 80 वषीय वृद्धेची फसवणूक 

कॉलेज रोडवरील प्रकार, 50 हजारांची फसवणूक, चेन, अंगठीसह रोख रक्कम लंपास 

प्रतिनिधी/ बेळगाव

आमच्या शेठजीला 15 वर्षांनी मुलगा झाला आहे. त्यांना आशीर्वाद दिला तर मदत करतील. तुम्ही गरीब आहे, असे दाखविण्यासाठी गळय़ातील चेन व अंगठी पर्समध्ये काढून ठेवा, असे सांगून लक्ष विचलित करत एका 80 वषीय वृद्धेची हातोहात फसवणूक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास कॉलेज रोडवर हा प्रकार घडला आहे. सोन्याची चेन, अंगठी व रोख रक्कम असा  50 हजारांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. या प्रकरणी खडेबाजार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिला जगन्नाथ शिंदे (वय 80, रा. गोंधळी गल्ली)  असे त्या वृद्धेचे नाव आहे. काही कामानिमित्त बेंगळूरला जावयाचे असल्याने त्या रेल्वे स्टेशनकडे तिकीट बुक करण्यासाठी निघाल्या होत्या. पवन हॉटेलनजीक एका व्यक्तीने त्यांना गाठले. आमचा शेटजी फार मोठा माणूस आहे. त्यांना मुलगा झाला आहे. आशीर्वाद देण्यासाठी या, अशी विनवणी त्याने केली. यावेळी आजीने नकार दिला असता ते साडी, चोळीचा आहेर देतील, असे सांगण्यात आले.

आजकाल वृद्ध माणसे मिळत नाहीत. तेव्हा तुम्ही भेटलात बरे झाले. आमचे शेठजी जवळच आहेत. या असे सांगत त्याने आजीला हायटेक लॅब शेजारील कोपऱयात नेले. तेथे खाली बसवून शेठजी थोडय़ाच वेळात येतील. तुमच्या गळय़ातील चेन व अंगठी काढा. तुम्ही गरीब आहात असे वाटले तर ते पैसेही देतील, अशा भूलथापा त्या व्यक्तीने चालविल्या होत्या. इतक्मयात एका पिशवीत कुरकुरे आणि ब्रेड तसेच 200 रुपये रोख रक्कम घेऊन आणखी एक व्यक्ती तेथे दाखल झाली. शेठजीने तुम्हाला फराळ दिला आहे, असे सांगून त्यानेही चेन व अंगठी काढून या पिशवीत ठेवा, असे सांगितले.

या भूलथापांना बळी पडत आजींनी चेन व अंगठी आपल्या पर्समध्ये ठेवली. ती पर्स आपल्याच जवळ ठेवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याचवेळी ते बघा शेठजी आले, असे सांगत त्यांचे लक्ष विचलित करण्यात आले. या गडबडीत त्या क्यक्तीने दिलेल्या पिशवीत आजीने आपली पिशवी ठेवली होती. शेठजी आले, म्हणता म्हणता दुसरा व्यक्ती आजींची पर्स व पिशवी घेवून गायब झाला. तर पहिला व्यक्ती येथेच थांबा शेठजींना घेवून येतो, म्हणत गायब झाला.

काही वेळ वाट बघितल्यानंतर आजीच्या लक्षात एकंदर प्रकार आला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मंगळवारी रात्री उशीरा या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. अनोळखी ठकसेनांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Related posts: