|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » योगी आदित्यनाथ यांना इसिसकडून धमकी

योगी आदित्यनाथ यांना इसिसकडून धमकी 

ऑनलाईन टीम / लखनौ :

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी येणे सुरु झाले आहे. योगी आदित्यनाथ यांना इसिसकडून धमकी देणारे पत्र मिळाले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

एका कागदावर इसिस आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारा संदेश त्या पत्रामध्ये देण्यात आला आहे. तसेच 24 मार्चला पूर्वांचलमध्ये विद्रोह माजवण्यात येणार आहे. जर या विद्रोहापासून आपण स्वतःचा बचाव करु शकत असाल तर बचाव करा, अशी धमकीही या पत्रकात देण्यात आली आहे. दरम्यान, हे पत्रक कोणी फेकले याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नसून या धमकीनंतर गुप्तचर यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा पुढील तपास मिर्झामुराद पोलीस करत आहेत.