|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » 19 एप्रिलला लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिका निवडणुका

19 एप्रिलला लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिका निवडणुका 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील तीन महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, लातूर, परभणी आणि चंद्रपूर या तीन महापालिकांचे मतदान 19 एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 21 एप्रिलला जाहीर केला जाणार आहे.

राज्यातील दहा महानगरपालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. पुणे, ठाणे आणि मुंबई या महापालिकांची निवडणूक पार पडली. त्यानंतर आता उर्वरित महापालिकांपैकी तीन महापालिकांचे निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. यामध्ये चंद्रपूर, परभणी आणि लातूर या शहरातील महानगरपालिका निवडणूक 19 एप्रिलला होणार असून, 21 एप्रिलला या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.