|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हा पोलीस भरतीला सुरुवात

जिल्हा पोलीस भरतीला सुरुवात 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा पोलीस भरतीला बुधवारी सुरुवात झाली. पोलीस शिपायांच्या 66 जागा या भरतीमधून भरल्या जाणार आहेत. यासाठी पहिल्या दिवशी 347 जणांची प्राथमिक चाचणी झाली. यामध्ये 313 जणांची निवड शारीरिक चाचणीसाठी करण्यात आली. 31 मार्चपर्यंत ही निवड चाचणी सुरू राहणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश माने यांनी दिली.

 सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या भरती प्रक्रियेत प्रारंभी सर्व उमेदवारांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. यामध्ये गोळा फेक, लांब उडी, 100 मीटर धावणे, यांचा समावेश होता. 347 उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला. यातील 317 जणांची निवड शारीरिक चाचणीसाठी घेण्यात येणार आहे. आज (गुरुवारी) शारीरिक चाचणीसाठी सोळाशे मीटर धावणे हा प्रकार असून यासाठी कसबा बावडा येथे मार्ग निश्चित करण्यात आला आहे. शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होणाऱया उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी आणि लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण 66 जागा भरायच्या असून त्यातील 19 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

यंदा पहिल्यांदाच भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. उमेदवारांची बायोमेट्रिक शारीरिक चाचणी होणार असल्याने लेखी परीक्षेत डमी उमेदवार बसवता येणार नाही. तसेच शारीरिक चाचणीमध्ये धावणाऱया उमेदवारांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे..

Related posts: