|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » Top News » नारायण राणे शिवसेनेत परतणार?

नारायण राणे शिवसेनेत परतणार? 

ऑनलाईन टीम/ मुंबई :

पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे शिवसेना- भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. नारायणे राणेंची काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने ते पक्ष बदल करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

अलीकडेच नारायण राणे यांचे थोरले चिंरजीव निलेश राणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करत काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. नारायण राणेंना शिवसेनेत प्रवेश द्यायचा क, नाही यावर शिवसेनेत मंथन सुरू असल्याच वृत्त एका वृत्तलाहिनीने दिले आहे. 2004 मध्ये नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला अनेक धक्के दिले होते.

 

Related posts: