|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » खासदार उदयनराजे यांच्यावर गुन्हा दाखल

खासदार उदयनराजे यांच्यावर गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / सातारा :

साताऱयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या सहकाऱयांनी राजकुमार जैन यांना मारहाण करुन त्यांच्याकडील काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरुन खासदार भोसले यांच्यावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज नावाची कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्त्वात काम करणारी माथाडी कामगार संघटना आहे. उदयनराजे यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावले. त्यावेळी उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱयांनी जैन यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलिसांनी उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला.