|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अंकुर मित्तलला सुवर्ण

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अंकुर मित्तलला सुवर्ण 

वृत्तसंस्था’ मेक्सिको सिटी

भारताचा स्टार नेमबाज अंकुर मित्तलने आपल्या शानदार कामगिरीसह मेक्सिको सिटी येथे सुरु असलेल्या आयएसएफ शॉटगन विश्वचषक स्पर्धेत डबल ट्रप प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, 24 वर्षीय अंकुरचे विश्वचषक स्पर्धेतील दुसरे पदक ठरले आहे. अंतिम लढतीत त्याने ऑस्ट्रेलियन जेम्स विलेटला मागे टाकले. ऑस्ट्रेलियन विलेटला रौप्य तर चीनच्या यिंग क्वीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

24 वर्षीय युवा खेळाडूने डबल ट्रप प्रकारात गत महिन्यात दिल्ली येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. तर ऑस्ट्रेलियन जेम्स विलेट या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. मात्र, मेक्सिको येथे सुरु असलेल्या शॉटगन विश्वचषक स्पर्धेत अंकुरने याची परतफेड केली. अंकुरने संपुर्ण दिवसभरात चांगली कामगिरी केली. पात्रता फेरीत 150 पैकी 138 गुणाची कमाई करत तो दुसऱया स्थानी राहिला होता. जेम्स 142 गुणासह पहिल्या स्थानी राहिला होता. सहा खेळाडूंच्या या अंतिम फेरीत त्याने तब्बल 80 पैकी 75 गुणाची कमाई केली व सुवर्णपदक मिळवले. शिवाय, या स्पर्धेत त्याने भारताला पहिले पदक मिळवून दिले. ऑस्ट्रेलियन विलेटला 73 गुणासह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या गिंग क्वीने 52 गुणासह कांस्यपदक मिळवले.

या विश्वचषक स्पर्धेत आता पुरुष व महिला स्कीट स्पर्धा या आठवडय़ात होणार आहे. महिला स्कीटमध्ये भारताची एकमेव आशा रश्मी राठोडवर आहे. पुरुष गटात अंगद वीर सिंग बाजवा व मान सिंग व अमरिंदर सिंह चीमा यांच्यावर आशा असणार आहेत.