|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रमेश देसाई यांना ‘गाथामूर्ती सद्गुरु’ पुरस्कार

रमेश देसाई यांना ‘गाथामूर्ती सद्गुरु’ पुरस्कार 

प्रतिनिधी/ सेनापती कापशी 

बामणे ता. भुदरगड चे ग्रामस्थ व गाथामूर्ती सद्गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर वारकरी सेवा प्रतिष्ठान उत्तूर यांच्यावतीने देण्यात येणारा ‘गाथामूर्ती सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर समाजभूषण’ पुरस्कार अर्जुनी ता. कागल येथील रमेश देसाई यांना देण्यात आला.

रमेश देसाई यांनी अर्जुनी ता. कागल येथे 1994 मध्ये वाचनालयाची स्थापना करुन व्यसनमुक्ती, पाणीबचत, ग्रामस्वच्छता, स्त्राr-भ्रूण हत्त्या या विषयावर व्याख्याने आयोजित केली होती. हुशार, होतकरु विद्यार्थ्यांना पाठबळ दिले. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, अर्जुनी ते गायकवाडी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, फटाके व डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात प्रयत्न, वाचक चळवळीचे कार्य याशिवाय विविध सामाजिक उपक्रम राबविल्याने देसाई यांना हा पुरस्कार देवून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ते मोहनलाल दोशी विद्यालयात अध्यापक म्हणून काम करतात.

प्रतिष्ठाचे अध्यक्ष ह. भ. प. डॉ. शिवाजीराव पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. सचिव संदीप हातकर यांनी आभार मानले. याप्रसंगी रमेश देसाई यांनी पुरस्कार मिळाल्याने आपली जबाबदारी वाढल्याचे सांगितले. यावेळी मारुती जाधव, अक्षय सुर्यवंशी, राघव सुतार, तुळशीदास रावण, तानाजी जाधव, नवनाथ हजारे, येजरे महाराज, रितेश वाडकर आदी उपस्थित होते.

Related posts: