|Friday, July 20, 2018
You are here: Home » Top News » खासदार गायकवाडांचे विमानाचे तिकीट रद्द ; एअर इंडियाचा निर्णय

खासदार गायकवाडांचे विमानाचे तिकीट रद्द ; एअर इंडियाचा निर्णय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

एअर इंडियाच्या कर्मचाऱयांना मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार यांचे दिल्लीहून पुण्यात परतण्याचे विमानाचे तिकिट एअर इंडियाने रद्द केले. त्यामुळे गायकवाडांना परतण्यास अडचणी येणार असल्याची शक्यता आहे.

पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱया एअर इंडियाच्या विमानातून खासदार गायकवाड प्रवास करत होते. त्यावेळी जागेच्या कारणावरुन गायकवाड आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱयांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संपप्त झालेल्या खासदारांनी त्या कर्मचाऱयाला चपलेने मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ एअर इंडियाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या कारवाईचाच भाग म्हणून एअर इंडियाकडून गायकवाडांना तिकीट नाकारण्यात आले.

Related posts: