|Monday, January 21, 2019
You are here: Home » उद्योग » लोकांना ऑनलाईन सुरक्षित इंटरनेटची आवश्यकता

लोकांना ऑनलाईन सुरक्षित इंटरनेटची आवश्यकता 

ऑनलाईन फसवणूक, धोक्याबाबत भारतीय लोक अधिक सजग असल्याची सर्वेक्षणात नोंद

वृत्तसंस्था / मुंबई

इंटरनेटचा वापर जसजसा वाढू लागला आहे, तसतसे ऑनलाईन वापरामुळे येणारे धोके टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आवश्यक पावले उचलण्यावर भर दिला जात आहे. सुरक्षित इंटरनेट दिनाच्या (एसआयडी) निमित्ताने मायक्रोसॉफ्टने आपल्या डिजिटल सभ्यता निर्देशांकाद्वारे जवळपास 14 देशांतील काही ठळक बाबी सर्वांसमोर आणल्या आहेत.

डिजिटल सभ्यतेच्या आवश्यकतेविषयी जनजागृती करतानाच सुरक्षित आणि ऑनलाईनद्वारे सर्वसमावेशक संवाद वाढविण्याच्या दिशेने डिजिटल सभ्यता निर्देशांक हा मायक्रोसॉफ्टच्या प्रयत्नांना एक भाग आहे. सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या निमित्ताने मायक्रोसॉफ्ट संवादाचे वास्तविक जगाचे परिणाम जाणून घेण्यासाठी युवा पिढी, प्रौढ, पालक तसेच शिक्षक आणि निर्णयकर्त्यांना शिक्षित करणे किती गरजेचे आहे, याबाबतची प्रात्यक्षिके या निर्देशांकाद्वारे दाखविण्यात येणार आहेत. डिजिटल सभ्यतेच्या दिशेने ग्लोबल ड्राईव्हसाठी या सर्वेक्षणाचा उपयोग उघडपणे केला जाईल, अशी आशा आहे. इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये जबाबदारी वाढीस लागेल, अशी आशा आहे, असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे असोशिएट जनरल कौन्सिल मधू खत्री यांनी सांगितले. या सर्वेक्षणातील निकाल ऑनलाईन वर्तन आणि संवाद याविषयी लोकांचा दृष्टिकोन आणि समज अधोरेखित करते.

वर्तणूक, प्रतिष्ठा, लैंगिक, वैयक्तिक/अनाहूत या चार विभागांत ऑनलाईनद्वारे येणाऱया 17 विविध धोक्यांविषयीचा अनुभव आणि त्यावर केलेले उपाय याविषयी युवा पिढी (13 ते 17 वर्षाखालील) आणि प्रौढ पिढी (18 ते 74 वर्षाखालील) यांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली.

पुढाकार…

ऑनलाईन सुरक्षिततेबाबत मायक्रोसॉफ्टने दीर्घकाळ बांधिलकी जपली आहे. सुरक्षित इंटरनेट दिनाला 2004 पासून सुरुवात झाली. जगभरातील विविध देशांच्या सरकारच्या सहकार्याने उपाययोजना विकसित करण्यासाठी तसेच ऑनलाईन धोक्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रभावी सार्वजनिक धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

Related posts: