|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » सरकारी बँकांच्या समभागांमुळे बाजारात तेजी

सरकारी बँकांच्या समभागांमुळे बाजारात तेजी 

बीएसईचा सेन्सेक्स 89, एनएसईचा निफ्टी 22 अंशाने वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई 

सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात बाजारात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.25 टक्क्यांनी वधारत बंद झाले. तेजी आल्याने निफ्टी 9,133 आणि सेन्सेक्सने 29,540 पर्यंत मजल गाठली होती. शेवटी निफ्टी 9,100 च्या वर बंद होण्यास यशस्वी झाला. बँक समभागांनी चांगली कामगिरी केली.

बीएसईचा सेन्सेक्स 89 अंशाने वधारत 29,421 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 22 अंशाच्या तेजीने 9,108 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वधारला.

बँकिंग, एफएमसीजी, धातू आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागात सर्वात जास्त खरेदी झाली. बँक निफ्टी 1.1 टक्क्यांनी मजबूत होत 21,122 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 3.3 टक्क्यांनी वधारला.

निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 0.5 टक्के आणि धातू निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 0.4 टक्क्यांच्या तेजीने बंद झाला. मात्र आयटी, वाहन आणि औषध समभागात दबाव दिसून आला. निफ्टीचा आयटी निर्देशांक 0.75 टक्क्यांनी घसरत बंद झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

बँक ऑफ बडोदा, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, गेल आणि रिलायन्स इन्डस्ट्रीज 4.25-1 टक्क्यांनी वधारत बंद झाले. ग्रासिम, टेक महिंद्रा, टीसीएस, अंबुजा सिमेंट, भारती इन्फ्रा, ल्यूपिन, बजाज ऑटो, इन्फोसिस आणि ओएनजीसी 3.1-0.6 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात ओरिएन्टल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, यूनियन बँक आणि अलाहाबाद बँक 6.5-3 टक्क्यांनी मजबूत झाले. स्मॉलकॅप समभागात रायसाहेब मिल्स, वॅबको इंडिया, स्टार फेरो, केईसी इन्टरनॅशनल आणि हाय ग्राऊंड 19-8.5 टक्यांनी वधारले.

मिडकॅप समभागात एनएलसी इंडिया, जिंदाल स्टील, ग्लैक्सोस्मिथ कंझ्युमर, ब्लू डार्ट आणि रिलायन्स कॅपिटल 8.7-1.8 टक्क्यांनी घसरले.