|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » खासदार गायकवाड गेले विमानाने अन् परतले रेल्वेने

खासदार गायकवाड गेले विमानाने अन् परतले रेल्वेने 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी तिकीट रद्द केल्याने गायकवाड यांना अखेर रेल्वेने परतावे लागले. विमानाप्रमाणे त्यांनी रेल्वेतही वाद घातल्याची माहिती मिळत आहे.

खासदार गायकवाड यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे मथुरा येथे रेल्वे थांबवण्यात आली. त्यांची प्राथमिक तपासणीही करण्यात आली. तपासणी दरम्यान रक्तदाब सामान्य असल्याचे लक्षात आले. गायकवाडांच्या प्रकृती अस्वास्थामुळे अतिरिक्त दोन मिनिटे मथुरा जंक्शनवर थांबवण्यात आली. दिल्लीपासून रेल्वे रवाना झाली. तेव्हा गायकवाडांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला.

Related posts: