|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पत्नीनेच केला भावाच्या मदतीने पतीचा खून

पत्नीनेच केला भावाच्या मदतीने पतीचा खून 

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

चोरोची येथील निळू उर्फ भिमराव गोरख साबळे याच्या खून प्रकरणाचा छडा कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक शिराज इनामदार यांनी अवघ्या 24 तासात लावून तीन आरोपींना अटक केली. निळूच्या पत्नीनेच भावाच्या व अन्य दोन तरुणांच्या मदतीने खून केल्याचे निळू ची पत्नी दिपाली हिने कबूल केले आहे. चोरोची च्या खूनाचे आव्हान पोलिसांनी सामर्थ्यपणे पेलून आरोपी गजाआड केले.

मयत निळू उर्फ भिमराव साबळे यांचा कोणीतरी अज्ञातांनी खून केल्याची फिर्याद निळूची पत्नी दिपाली (वय 28) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली होती. दिपाली यांच्या फिर्यादीनुसार पोलीस खूनाच्या तपासाकडे वळले होते पण शुक्रवारी चोरोची पासून जवळच असलेल्या जांभूळवाडी हद्दीत अविनाश यमगर यांच्या विहिरीमध्ये निळूचे प्रेत आढळून आले. आणि सगळी यंत्रणा आर्श्चयचकीत झाली. कवठेमहांकाळ पो.नि. शिराज इनामदार आपल्या फौज फाटय़ासह घटनास्थळी पोहोचले. निळू चे प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यात आले तेंव्हाच पोलिसांच्या मनात हा खूनाचा प्रकार असल्याची पाल कुचकुचली.

निळू उर्फ भिमराव साबळे यांच्या खूनाचे गुढ उकलने पोलिसांसमोर एक आव्हान होते. पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, जतचे पोलीस उपअधिक्षक नागनाथ वाकुडे यांनी या खूनाबाबत इनामदार यांना योग्य सूचना दिल्या व इनामदार या तपासाच्या मागे लागले.

मयत निळू उर्फ भिमराव साबळे यांना दारुचे व्यसन होते अशी माहिती पोलिसांना लागताच, त्यांनी आपला मोर्चा निळूची पत्नी दिपाली यांच्याकडे वळवला. दिपाली यांच्याकडे निरीक्षक इनामदार यांनी निळू बद्दल माहिती विचारली. निळू दारु पित असल्याचे पत्नीने सांगितल्यानंतर पोलिसांचा निळूच्या खूनबाबतचा संशय पत्नीकडेच बळावला आणि मग निळू च्या खूनाबाबतची घटना दिपाली यांनी पोलिसांना सांगितली.

आपले पती भिमराव हे दारुच्या आहारी गेले होते. ते दारु पिऊन वारंवार मारहाण करीत होते. त्यांच्या मारहाणीला आपण कंटाळलो होतो त्यामुळेच आपला भाऊ रमेश काळे (वय 21 रा. जत) त्याचा मित्र महेश कांबळे (वय 23 रा. जत) व निलेश ऐवळे (रा.जत) यांना 23 रोजी बोलावून घेतले त्या रात्री पती भिमराव भरपूर दारु प्यायले होते. आपले भाऊ व त्यांचे मित्र चोरोची येथे रात्री 9 वा. आले आणि मी व तीघांनी पतीचा दोरीने गळा आवळला आणि त्यांचे प्रेत मध्यरात्री जांभूळवाडी येथील विहिरीत फेकून दिले. अशी माहिती पत्नी दिपाली यांनी पोलिसांना दिल्याने दिपाली सह चार जणांवर भिमरावच्या खून प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दिपाली साबळे, रमेश काळे, महेश कांबळे या  तिघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. तर निलेश ऐवळे फरार आहे, त्यालाही लवकरच ताब्यात घेवू असे इनामदार यांनी स्पष्ट केले.

दारुडय़ा पतीचा खून करुन व त्याचा खून अज्ञातांनी केला असा बनाव करणाऱया पत्नीलाच आरोपी शोधून काढले हे पोलिसांनी मोठय़ा कौशल्याने कामगिरी केली आहे. भिमराव च्या खूनाचे आव्हान बबून राहिलेल्या आरोपींना पो.नि. शिराज इनामदार यांनी अवघ्या 24 तासात अटक करुन फत्ते कामगिरी केली आहे.

Related posts: