|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » डॉक्टरांवर झालेल्या हल्याच्या निषेर्धात आंदोलन

डॉक्टरांवर झालेल्या हल्याच्या निषेर्धात आंदोलन 

वार्ताहर/ एकंबे

धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ कोरेगाव तालुक्यातील डॉक्टरांच्या तीन संघटनांच्यावतीने बंद आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. राज्यातील डॉक्टरांवर सातत्याने होत असलेल्या हल्यांबाबत शासनाने गांर्भीयाने भूमिका घ्यावी व दोषींवर कायद्यातील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

इंडियन मेडिकल असोसिएशन, कोरेगाव तालुका मेडिकल असोसिएशन आणि जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन शाखांच्यावतीने अध्यक्ष डॉ. नारायण बर्गे, डॉ. शीतल गोसावी, डॉ. विजय शहा, उपाध्यक्ष डॉ. सागर भंडारी, सचिव डॉ. संजय चिवटे, खजिनदार डॉ. रणजितसिंह सावंत, कार्यकारिणी सदस्य डॉ. संजय क्षीरसागर, डॉ. मिलिंद शहा, डॉ. वरदराज काबरा, डॉ. राजेंद्र गोसावी, डॉ. संजय मोरे, डॉ. रोहीत मोरे, डॉ. सारिका मस्कर, डॉ. गणेश होळ यांच्यासह तालुक्यातील डॉक्टरांनीनी निवासी नायब तहसीलदार श्रीरंग मदने, पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे यांना निवेदन सादर करुन डॉक्टरांवर हल्ले करणाऱयांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.