|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » गोहत्या करणाऱयाचे हात-पाय तोडायला सांगेन ; भाजप आमदाराची धमकी

गोहत्या करणाऱयाचे हात-पाय तोडायला सांगेन ; भाजप आमदाराची धमकी 

ऑनलाईन टीम / लखनौ :

गोहत्या करणाऱयांचे हात पाय तोडायला लावेन, अशी धमकीच भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रम सैनी यांनी दिली. उत्तरप्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना सैनी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

उत्तरप्रदेशमध्ये बहुमताने सत्ता स्थापन केलेल्या भाजपने मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची निवड केली. त्यांच्या मंत्रिमंडळात सुरेश राणा यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. राणा यांच्या स्वागतासाठी आयोजित एका कार्यक्रमात सैनी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, जी लोक गाईला मानत नाही आणि तिची हत्या करतात, अशा लोकांचे मी हात-पाय तोडायला लावेन. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related posts: