|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नशेत वाहने चालविणाऱया 50 जणांविरूद्ध कारवाई

नशेत वाहने चालविणाऱया 50 जणांविरूद्ध कारवाई 

प्रतिनिधी/ बेळगाव

जिह्यातील विविध भागात दारुच्या नशेत वाहने चालविणाऱया 50 वाहन चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ाभरात 37 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बी. आर. रविकांतेगौडा यांनी सोमवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

जिह्यात विविध गुह्यांत 98 जणांना अटक करण्यात आली आहे. बेकायदा वाळू वाहतूक, बेकायदा दारु विक्री, मटका, जुगारी अड्डय़ांवर छापे टाकण्यात आले आहेत. वाळू वाहतूक प्रकरणी 25 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 1 लाख 42 हजार 400 रुपये किमतीची वाळू, आठ ट्रक्टर व ट्रॉली, पाच ट्रक, एक टिप्पर व एक डिझेल इंजिन जप्त करण्यात आले आहे.

बेकायदा दारु विक्री प्रकरणी 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर 11 जणांना अटक करुन 33 हजार 662 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन जुगारी अड्डय़ांवर छापे टाकून 11 जुगाऱयांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून 2 हजार 910 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस प्रमुखांनी दिली आहे.

मटकाबुकींविरूद्ध कारवाई सुरुच ठेवण्यात आली आहे. 14 गुन्हे दाखल करुन 17 मटकाबुकींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 14 हजार 670 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. तर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱया 4 हजार 213 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन 6 लाख 95 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Related posts: