|Thursday, July 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशि-भविष्य

राशि-भविष्य 

श्रीराम रक्षा स्तोत्र संकटनाशासाठी रामबाण

अंतिम भाग

बुध. दि. 29 मार्च ते मंगळ 4 एप्रिल 2017

मेष

राशिस्वामी मंगळ बलवान आहे. लक्ष्मीयोगाचा काळ सुरू आहे. कोणताही नवीन उद्योग व्यवसाय सुरू करा. जोरात चालेल. शुक्राचे सहकार्य चांगले आहे. सर्व लोक अनुकूल राहतील. दूरचे प्रवास जपून करावेत. लग्नाच्या वाटाघाटीत भाग घेवू नका. काहीतरी गैरसमज होईल. गुरुचे भ्रमण काही बाबतीत शुभ असल्याने करार मदार यशस्वी होतील.


वृषभ

मंगळ प्रभावी आहे. खर्चात वाढ होईल. मशिनरी जपून हाताळा. कायदेशीर व्यवहारात सावध राहणे आवश्यक. शुक्राचे पाठबळ चांगले असल्याने सतत पैसा मिळत राहील. शनि प्लुटोचे भ्रमण राजकारणातील लोकांना त्रासदायक ठरण्याची शक्मयता आहे. पंचमातील राहू संततीबाबत काही समस्या निर्माण करील. तसेच घराण्यातील काही दोषही जागृत होतील. कुलदेवतेची उपासना चालू ठेवा.


मिथुन

लाभस्थ मंगळ सर्व कार्यात मोठे यश मिळवून देईल. जागा, घर, वाहन या संदर्भातील कोणतेही व्यवहार यशस्वी होतील. शुक्राचे भ्रमण नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण ठेवील. सर्व लोक अनुकूल राहतील. अशक्मय कोटीतील काही गोष्टी साध्य होतील. मंगळ शनिचा शुभयोग दीर्घकालीन समस्या सोडविण्यास सहाय्यक ठरेल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील.


कर्क

दशमस्थ मंगळामुळे मनात जे आणाल ते साध्य करू शकाल. कोणतेही आर्थिक धाडस करा यश मिळेल. जागेचे व्यवहार यशस्वी होतील. भाग्यस्थ शुक्रामुळे शुभकार्यासाठी प्रवास योग. आध्यात्मिक मार्गात असाल तर दैवी अनुभूती येण्याची शक्मयता. शनिच्या प्रभावामुळे शत्रू थंड पडतील. कोणतेही अवघड काम यशस्वी करून दाखवाल. गुरुचे भ्रमण लिखाणास प्रसिद्धी देईल. तसेच नातेवाईकांशी संबंध सुधारतील.


सिंह

भाग्यस्थ प्रभावी मंगळामुळे इतरांकडून महत्त्वाची कामे करून घ्याल. तुमच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होईल. तसेच आदर्शही घेतला जाईल. अष्टमस्थ शुक्रामुळे आर्थिक स्थिती समाधानकारक राहिल. जुनी येणी वसूल होतील. मानसिक संभ्रम निर्माण करणाऱया काही नव्या समस्या उद्भवतील. त्यामुळे काही निर्णय चार चौघांच्या सल्यानेच  घ्या. चुका होणार नाहीत, याची काळजी घ्या.


कन्या

अष्टमातील मंगळ, बुधाचे भ्रमण काही वेळा तापदायक ठरू शकते. पण घर, जागा,  वाहन या संदर्भातील कोणतेही व्यवहार यशस्वी होतील. आजार अपघात, शस्त्रक्रिया यापासून सावध राहणे आवश्यक. शुक्राचे भ्रमण वैवाहिक जीवन, आर्थिक स्थिती आणि दूरचे प्रवास याबाबतीत शुभ आहे. कोणत्याही प्रसंगात वादावादी निर्माण होणार नाही. याची काळजी घ्या. शनिचे भ्रमण आरोग्याच्या बाबतीत किंचित त्रासदायक ठरेल.


तुळ

सप्तमस्थानी मंगळाचे भ्रमण प्रभावी असल्याने वैवाहिक जोडीदाराचे वर्चस्व वाढेल. किरकोळ गोष्टी उग्रस्वरुप धारण करतील. पण त्याचा धसका इतरांना बसेल. त्यामुळे काहीजण आपोआप दूर जातील. शुक्राचे भ्रमण किरकोळ गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग निर्माण करतील. नोकरीसाठी प्रयत्न केले असतील तर त्यात यश मिळेल. आर्थिक अडचणी कमी होतील. कौटुंबिक जीवनात नव्या किंमती वस्तुंच्या खरेदीमुळे उत्साह राहिल.


वृश्चिक

शुक्राचे भ्रमण सर्व कार्यात यश देणारे आहे. विवाह, मुंज वास्तुशांत व तत्सम कार्यात यश मिळेल. राशिस्वामी मंगळ प्रभावी असल्याने कोणतेही अवघड काम, योजना यशस्वी करून दाखवाल. काही फसव्या योजनामुळे व चुकीच्या धोरणामुळे अडचणीत याल. शनिचे भ्रमण काही बाबतीत लाभदायक ठरणार आहे. वाहन आणि वास्तुसंदर्भात त्याचा चांगला अनुभव येईल.


धनु

प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवे शिकायला मिळेल, असा संदेश देणारा हा आठवडा आहे. आगामी कालखंडात बरेच महत्त्वाचे फेरबदल घडण्याचे संकेत आहेत. नोकरी व्यवसायात शुभ घटना. पंचमस्थ मंगळामुळे धाडसीवृत्ती वाढेल. अनावश्यक वस्तुसाठी खर्च कराल. चतुर्थातील शुक्राचे भ्रमण अनेक बाबतीत यश, समृद्धी, मान-सन्मान, घरगुती सुधारणा यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. देवीची उपासना चालू ठेवा.


मकर

अडलेले वास्तु अथवा जागेचे व्यवहार यशस्वी होतील. आर्थिक व्यवहारात उत्तम यश. मनोरंजनासाठी सहलीचे योग. मंगळाचे भ्रमण प्रभावी असल्याने किरकोळ कारणावरून मतभेद होण्याची शक्मयता. कोणत्याही प्रकारचे तांत्रिक शिक्षण असेल तर यशस्वी व्हाल. काहीजणांना नोकरीत उच्चपद मिळण्याची शक्मयता. नवीन कोणताही व्यवसाय सुरू  करणार असाल तर योग्य वेळ आहे. साडेसातीचा तूर्तास कोणताही प्रभाव पडणार नाही.


कुंभ

राशिस्वामी लाभात एक प्रकारचा राजयोग त्यामुळे घर, जागा, वाहन घेण्यास हरकत नाही.पण मित्र मंडळीपासून जपावे लागेल. धनस्थ शुक्रामुळे हाती सतत पैसा खेळत राहील. कोणतेही आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. संगीत  कलेत अपेक्षित यश मिळेल. क्रिडास्पर्धा व तत्सम परिक्षेत यश मिळेल. कर्जफेड करू शकाल. अष्टमस्थ गुरुमुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. मधूमेहाचा आजार असेल तर काही रत्ने काढून ठेवा.


मीन

गुरु शुक्राचा शुभयोग  सर्व कार्यात यश देणारा आहे. कौटुंबिक जीवनात समाधानकारक वातावरण राहील. जे काम हाती घ्याल ते निश्चित यशस्वी होईल. शनिचे भ्रमण नोकरी व्यवसायात स्थैर्य देईल. मंगळ प्रभावी असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. हर्षलचे भ्रमण अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आगामी चार दिवसात कोणतेही निर्णय घेताना विशेष काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहारात जपावे लागेल. कोर्ट कचेऱयांची प्रकरणे मार्गस्थ होतील.