|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » टेहाळणी बुरूज पर्यटकांना पाहाण्यासाठी खुला करा

टेहाळणी बुरूज पर्यटकांना पाहाण्यासाठी खुला करा 

पन्हाळा / प्रतिनिधी

    शिवाजी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पन्हाळगडावरीलच व्हॅली यु या पंचतारांकीत हॉटेलच्या शेजारी असलेला टेहाळणी बुरुज पाहण्यासाठी जाण्यास पर्यटक, स्थानिक नागरिकयांच्या बरोबरच शासकीय अधिकाऱयांना देखील मज्जाव केला जातो. हा टेहाळणी बुरुज नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात यावा व येथील बेकायदेशीर बांधकाम काढण्यात यावे या मागणीचे निवेदन पन्हाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने तहसीलदार रामचंद्र चोबे यांना देण्यात आले.

 या निवेदनात म्हटले आहे की, रि. स. नंबर आठ जवळ असलेला टेहाळणी बुरुज व तटबंदी व्हॅली यु या पंचतारांकित हॉटेल मालकांनी नागरिकांना पाहण्यासाठी बंद केला आहे. या हॉटेलच्या शेजारी असणाऱया ऐतिहासिक टेहाळणी बुरुजाला जाण्यासाठी असणाऱया मार्गावर हॉटेल मालकांने अतिक्रमण केले असून टेहाहळणी बुरुजाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे येथे नागरिकांना तसेच पर्यटक व शासकीय अधिकाऱयांना बुरुजाकडे हॉटेल व्यस्थापनाकडून स्वमालकीचा बुरुज असल्यासारखे येथे जाण्यास मज्जाव करुन दादागिरीची भाषा वापरण्यात येत आहे. एवढच नव्हे तर या बुरुजावरील इतिहासकालीन फरशी काढून टाकण्यात आले आहेत. तर त्या ऐवजी आपला हॉटेलचा परिसर सुंदर दिसण्यासाठी या बुरुजावर नवीन मार्बलच्या फरशा बसविण्यात आल्या आहेत.

      पन्हाळ्यातील एखाद्या रहिवास्याने साधे स्वच्छतागृह बांधायचे म्हटले तर पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी येऊन काम बंद पाडण्याच्या सूचना संबंधीतांना देतातच याबरोबर पुरात्तव विभागाकडून पोलीसांच्यात बेकायदेशीर बांधकामाबाबत संबंधीतावर कारवाई करुन हे बांधकाम बंद पाडली जातात. मात्र अशा या इतिहासकालीन टेहाळणी बुरुजावरील बेकायदशीर नवीन बांधकाम केले असून पुरातत्त्व खात्याचे तटबंदीपासून 100 मीटर अंतराचे बांधकामाचा नियम धाब्यावर बसवून बांधकाम या हॉटेल मालकाने केले असूनदेखील पुरातत्त्व विभागाचे अथिकारी आर्थिक आमिषापोटी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निर्दशनास येत आहे.

     तरी अशा या इतिहासाचा साक्षीदार असलेला टेहाळणी बुरुजाकडे जाण्यास मज्जाव होत असल्याने इतिहास प्रेमी, शिवभक्त व नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने हा बुरुज पर्यटक, स्थानिक नागरिक व शासकीय अधिकारी यांना पाहण्यासाठी खुला करण्यात यावा. तसेच या बुरुजावरील असलेले बेकायदेशीर बांधकाम काढून घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अन्याथा याबाबत जनआंदोलन उभारण्याचा इशारा पन्हाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आला आहे.

    यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन भगवान, कार्याध्यक्ष देवदास वरेकर, सचिव अबिद मोकाशी, प्रकाश राऊत, शिवसेना शहर प्रमुख मारुती माने, भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, पत्रकार राजेंद्र दळवी, नितीन पाटील, बाबा जाधव, श्रीकांत पाटील, रघुनाथ मोरे, त्रुप्ती कांबळे, रत्न गवळी, शौकत मुल्ला, ओ.बी.सी. संघटनेचे उपाध्यक्ष मुंतजर मुजावर, सचिव हनिफ नगारजी, छायाचित्रकार अक्षय वाईंगडे, रजत राऊत आदी मान्यवर उपस्थीत होते.

Related posts: