|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुरूंदवाड पालिकेची कर वसुली मोहिम तीव्र

कुरूंदवाड पालिकेची कर वसुली मोहिम तीव्र 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

आता मार्च एंडला काही दिवसच बाकी असल्याने नगरपालिकेने शहरातील मालमत्ता धारकांकडील थकीत कर वसूल करण्यासाठी थकबाकी कर वसुली मोहिम अत्यंत तीव्र गतीने सुरू केली असून शहरातील प्रतिष्ठित नागरिकासह काही शासकीय, निमशासकीय कार्यालये, राजकीय नेते मंडळी याचे नावाचा भला मोठा डिजीटल फलक पालिका चौकात लावण्यात आला आहे. पालिका प्रशासनाने कर वसुलीसाठी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कर वसुलीसाठी 12 तास पालिका कार्यालय उघडे ठेवून ही मोहिम चांगलीच तीव्र केली आहे.

आरक्षण क्रमांक 77 औद्योगिक वसाहतमधील भुखंड धारक, शासकीय निमशासकीय कार्यालय व शहरातील कर आणि पाणी पट्टी थकबाकी झळकू लागल्याने नागरिकांनी हा फलक पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यात अनेक प्रतिष्ठित नाग†िरकांसह शासकीय व निमशासकीय कार्यालयांची नावे असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

पालिका प्रशासनाने मोठय़ा प्रमाणात असणारी थकबाकी वसूल करण्यासाठी तीन पथके कार्यरत केली आहेत. वसुली दरम्यान थकबाकी दारकांना पालिकेकडून वेळोवेळी सूचना देवून देखील थकबाकी वेळेत वसूल होत नसल्याने घरातील संगणक संच, एलसीडी, रंगीत टिव्ही संच, फ्रिज आदी वस्तू पालिकेने जप्त करायला सुरूवात केली आहे. तर पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा कनेक्शन खंडीत करण्यात येत आहे.

पालिका चौकात लावण्यात आलेल्या डिजीटल फलकावर सहा अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भाग 1, महाराष्ट्र राज्य विद्युत कार्यालय निवास या शासकीय कार्यालयाकडून 90 हजार रूपयांची थकबाकी तसेच तीन हजारापर्यंत कर थकबाकी असणाऱया शहरातील काही प्रतिष्ठित 73 जणांची नावे या फलकावर आहेत. पालिकेने 31 मार्च पर्यंत या थकबाकी दारकांनी आपले कर पालिकेत येवून भरावेत, अशा सूचना या फलकावर दिल्या आहेत.

चौकट – शंभर टक्के कर वसुलीसाठी मोहिम तीव्र

शहराच्या विकासासाठी शासकीय फंड मोठय़ा प्रमाणात उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. जेणेकरून शहर विकासासाठी शासकीय फंड कमी पडणार नाही. फंडाबाबत शासनाने तशी घोषणाही केली आहे. त्यामुळे वसुली मोहिम तीव्र करून जप्ती सुरू केली आहे. तसेच थकबाकी दारांना वांरोवार सूचना दिल्या आहेत, पण त्याकडे त्यांनी लक्ष न दिल्याने डिजीटल फलकाद्वारे नोटीस प्रसिद्ध केली आहे. तरी तीन हजारपर्यंत थकबाकी दारकांनी आपली देणी त्वरीत पालिकेत आणुन द्यावीत, असे आवाहन पालिका मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले आहे.

Related posts: