|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काशीकल्याणी मंदिराचा शिखर कलश स्थापना उत्साहात

काशीकल्याणी मंदिराचा शिखर कलश स्थापना उत्साहात 

वार्ताहर / हरमल

बामणभाटी येथील श्रीकाशीकल्याणी ब्राह्मण कुलदेवता मंदिराचा शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा गुढीपाडव्यादिनी उत्साहात साजरा झाला.

हरमल येथील नाईक (रामजी) कुटुंबियांचे हे कुलदैवत मंदिर बामणभाटी येथे बांधकाम करण्यात आले. सुमारे सहा पिढय़ापूर्वीचे हे देवस्थान घुमटीच्या स्वरूपात उध्दाराच्या प्रतिक्षेत होते. नाईक (रामजी) परिवाराकडून काल संपूर्ण दिवस शिखर कलश स्थापनेसह विविध धार्मिक विधी झाले. महाप्रसादाला कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. सायंकाळी बालकीर्तनकार नेहा उपाध्ये व साथी यांचे कीर्तन झाले. या शिखर कलश स्थापनेसाठी नाईक (रामजी) कुटुंबियांनी अथक परिश्रम घेतले.

फोटोः328 हरमल

हरमलः काशीकल्याणी मंदिरात शिखर कलश स्थापन करताना सुशांत नाईक (रामजी), भास्कर नाईक (रामजी), देविदास नाईक (रामजी), संजय नाईक व प्रदीप माज्जी.

 

Related posts: