|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » मोदींच्या काळातही भ्रष्टाचार थांबलेला नाही : अण्णा हजारे

मोदींच्या काळातही भ्रष्टाचार थांबलेला नाही : अण्णा हजारे 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार येऊन तीन वर्षे झाली आहेत. मात्र, तरीही भ्रष्टाचार थांबलेला नाही, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

अहमदनगर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत अण्णा हजारे बोलत होते. लोकपाल नियुक्तीच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकारला लोकपाल नियुक्ती करण्याची इच्छा नाही. लोकपालची नियुक्ती शक्य नसेल तर निदान राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती केली जावी. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तेथे लोकायुक्त नेमण्यात काय अडचण आहे, असा सवालही त्यांनी मोदी सरकारला विचारला.

Related posts: