|Saturday, October 20, 2018
You are here: Home » leadingnews » राज्यातील शेतकरी 1 जूनला जाणार संपावर

राज्यातील शेतकरी 1 जूनला जाणार संपावर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील शेतकरी येत्या 1 जूनपासून संपावर जाणार आहेत, याबाबतचा इशाराच शेतकऱयांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱयांनी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नगर जिह्यातील शेतकऱयांनी संपावर जाण्याचे ठरवले आहे.

राज्यातील शेतकऱयांना शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे या सर्व शेतकऱयांनी शेतमालाला योग्य भाव द्या, अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही, अशी भूमिका घेत संपावर जाण्याचा इशारा दिला. संपावर जाण्याच्या इशाऱयावरुन विशेष ग्रामसभा घेत याबाबतचा ठरावही केला आहे. अहमदनगर जिह्यातील पुणतांबा गावातून शेतकऱयांच्या आंदोलनाला सुरुवात होणार असून, त्यासाठी 3 एप्रिलला शेतकरी पुणतांब्यामध्ये दाखल होणार आहेत. शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात या संपात सहभागी व्हावे, यासाठी आवाहनही करण्यात येत आहे.

Related posts: