|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » क्रिडा » मोहम्मद इरफानवर एक वर्षाची बंदी

मोहम्मद इरफानवर एक वर्षाची बंदी 

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मोहम्मद इरफानला एक वर्षासाठी निलंबित केले असून या उंच वेगवान गोलंदाजाला 10 लाख रुपये (9500 डॉलर्स) दंडही केला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अध्यक्ष मोहम्मद आझम यांनी सांगितले की, पीएसएल स्पर्धेवेळी सट्टेबाजांनी आपल्याशी दोनदा संपर्क साधल्याचे इरफानने कबुल केले आहे. मात्र या पथकाला त्याबद्दलची माहिती त्याने योग्यवेळी दिली नाही. त्याने भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचे पुन्हा एकदा उल्लंघन न केल्यास त्याच्या निलंबनाचा कालावधी सहा महिन्यांनी कमी केला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 14 मार्चपासून त्याच्या निलंबनाचा कालावधी लागू झाला असून त्या दिवशी पीसीबीने त्याचे तात्पुरते निलंबन केले होते. याशिवाय शार्जील खान, खलिद लतिफ, शाहझेब हसन, नसिर जमशेद या अन्य चार खेळाडूंनाही पीसीबीने  तात्पुरते निलंबित केले आहे. स्पॉट फिक्सिंगमध्ये गुंतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Related posts: