|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पोलीस भरतीस आलेल्या तरुणांसाठी व्हाईटआर्मी तर्फे मोफत अन्नछत्र

पोलीस भरतीस आलेल्या तरुणांसाठी व्हाईटआर्मी तर्फे मोफत अन्नछत्र 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर 21 ते 29 मार्चदरम्यान राज्य राखीव पोलीस दलाची भरती प्रक्रीया सुरु होती. यासाठी रोज सहाशे तरुणांना बोलवले जात होते. भरतीसाठी येणाऱया या तरुणांची भरतीकाळात उपासमार होऊ नये. या उद्द्sशाने व्हाईट आर्मीतर्फे या तरुणांसाठी मोफत अन्नछत्र उभारण्यात आले हेते. भरती कालावधीमध्ये सुमारे तीन हजार तरुणांना या अन्नछत्राचा आधार मिळाला.

   भरतीसाठी आलेल्या तरुणांची जेवणाची गैरसोय होऊ नये, याकरीता व्हाईट आर्मीचे जवान स्वताच्या हाताने जेवण तयार करत होते. यामध्ये व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे, सचिव जयवंत कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत शेंडे यांच्या नेतृत्वाखाली योगेश सुतार, अभिजित कसपटे, विनायक भाट, सुधाकर लोहार, विकास गोते, निलेश वनकोरे, स्नेहल निर्मळे, केदार गुरव, ओंकार सावर्डेकर, गणेश विभुते, सतीश आंबी, उदय निंबाळकर यांनी अन्नछत्र यशस्वीरीत्या पार पाडले. यासाठी उज्वल नागेशकर आणि किशोर मुसळे ट्रस्ट यांचे सहकार्य मिळाले.

Related posts: