|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » क्रिडा » व्हीनस, कोन्टा उपांत्य फेरीत, केर्बर-हॅलेप पराभूत

व्हीनस, कोन्टा उपांत्य फेरीत, केर्बर-हॅलेप पराभूत 

वृत्तसंस्था /मियामी :

मियामी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या अनुभवी व्हिनस विलीयम्सने बुधवारच्या सामन्यात जर्मनीच्या टॉप सीडेड अँजेलिक केर्बरचा 7-5, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत व्हिनसची गाठ ब्रिटनच्या जोहाना कोंटाशी पडणार आहे.

36 वर्षीय व्हिनसने केर्बरला पराभवाचा धक्का देताना बेसलाईन खेळावर तसेच अचूक सर्व्हिसवर अधिक भर दिला होता. व्हिनसने 1998, 1999 आणि 2001 साली मियामी स्पर्धा जिंकली होती. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य एका सामन्यात ब्रिटनच्या 10 व्या मानांकित कोंटाने रूमानियाच्या सिमोना हॅलेपचा 3-6, 7-6 (7-5), 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. कोंटाने हा सामना अडीच तासात जिंकला. झेकची द्वितीय मानांकित प्लिसकोव्हा आणि डेन्मार्कची 12 वी मानांकित कॅरोलिना वोझ्नियाकी यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होईल.

Related posts: