|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आरपीआयचा राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा

आरपीआयचा राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा 

प्रतिनिधी/ राधानगरी

अभयारण्य परिसरात राहणा-या पाटपन्हाळा येथील गोरगरीब व निरपराध तरुणांना चोर समजून खोटे गुन्हे दाखल करून अमानुष मारहाण करणा-या वन कर्मचा-यांची चौकशी करून निलंबित करावे यासह अन्य मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार एन. व्ही. घोगरे यांनी स्वीकारले.

येथील बस स्थानकापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात प्रा. ाढांबळे यांनी मार्गदर्शन केले. मूळ निवासी नागरिकांना सर्व सुविधांसह पुनर्वसन होईपर्यंत वन कर्मचा-यांचा त्रास होऊ नये. यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही करावी. मूळ निवासी गरीब नागरिकांना घरकुल मंजूर झाली आहेत मात्र वन विभागाच्या जाचक अटीमुळे घरे बांधण्यास परवानगी मिळत नाही. वारसा हक्काप्रमाणे वारस नोंद घालण्यात यावी. यासह अन्य मागण्या निवेदनात आहेत. मोर्चात जिल्हाअध्यक्ष दयानंद कांबळे, उमेश शिंदे, सुरेश कांबळे, पुंडलिक कांबळे, रवींद्र कांबळे, विलास कांबळे, सुनील कांबळे, नामदेव कांबळे, सुनील कांबळे यांच्यासह अभयारण्य क्षेत्रातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: