|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » नवीन आर्थिक वर्ष, नवीन कर

नवीन आर्थिक वर्ष, नवीन कर 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतात आर्थिक वर्षाला प्रारंभ 1 एप्रिलपासून होतो. अर्थसंकल्पात प्रस्तावित असणाऱया सर्व प्रकारचे कर 1 एप्रिलपासून लागू करण्यात येतात. आर्थिक दरात होणारे बदल आणि नवीन वित्तीय नियमांमुळे सामान्य लोकांसाठी आवश्यक असणाऱया अनेक वस्तूंच्या किमतीवर परिणाम होता. आज, 1 एप्रिलपासून देशातील कोणत्या वस्तू महाग अथवा स्वस्त होणार आहेत, याचा तक्ता पुढे दिला आहे.

स्वस्त

 

? रेल्वे तिकिटावरील सेवा शुल्क कमी होणार असल्याने बुकिंग स्वस्त.

? व्याजदरात सवलत जाहीर केल्याने घर खरेदी स्वस्त.

? पाणीशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे आरओ.

? चर्मवस्तू. टपाल सेवा.

? नैसर्गिक वायू, बायोगॅस,

?       सौर ऊर्जेची बॅटरी, पॅनल.

महाग

? कार, मोटार सायकल आणि व्यावसायिक वाहनांचा विमा.

? तंबाकूजन्य पदार्थ, पान मसाला आणि गुटखावरील उत्पादन शुल्क 10 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर.

? सिगारेटवरील उत्पादनशुल्क 215 रुपये प्रति हजारावरून वाढवित 311 रुपये प्रति हजार.

? एलईडी बल्व तयार करणाऱया सामग्रीच्या सीमा शुल्कात 6 टक्क्यांनी वाढ.

? चांदीची भांडी आणि चांदीचा अन्य सामाने.

? मोबाईल फोन. फोन तयार करण्यात येणाऱया प्रिन्टेड सर्किट बोर्डवर सीमा शुल्क.

? स्टीलची भांडी, ऍल्यूमिनियम संबंधी वस्तू. ऍल्यूमिनियमवर 30 टक्के आयात कर.

? राष्ट्रीय महामार्गावरील करामध्ये 2 ते 3 टक्क्यांनी वाढ.

Related posts: