|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Automobiles » 29 लाख वाहनांना टोयोटा करणार ‘रि-कॉल’

29 लाख वाहनांना टोयोटा करणार ‘रि-कॉल’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जपानची प्रसिद्ध लग्झरी कार निर्माता कंपनी टोयोटाने कॉर्प एअरबॅगमध्ये खराबी असल्याने 29 लाख वाहनांना ‘रि-कॉल’ करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 7 लाख 50 हजार वाहनांची विक्री एकटय़ा जपानमध्ये करण्यात आली आहे.

कंपनीने सांगितले, एअरबॅगमध्ये बिघाड झाल्याने जपान, चीन आणि इतर क्षेत्रांमध्ये 29 लाख वाहनांना रि-कॉल करण्यात आले आहे. कंपनीच्या कोरोला एक्सियो सेडान आणि आर. ए. व्ही. -4 एस. यू. व्ही. क्रॉसओव्हर या वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. एअरबॅगमध्ये स्फोट झाल्याने 16 लोकांचा प्राण गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीने तब्बल 29 लाख वाहनांना रि-कॉल करण्यात येणार आहे.