|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वीज कोसळून पाच शेतकरी जखमी

वीज कोसळून पाच शेतकरी जखमी 

प्रतिनिधी/ बेळगाव

वीज कोसळून तुम्मरगुद्दी येथील पाच शेतकरी जखमी झाले. जखमीत चार महिलांचा समावेश असून शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. शेतात काम करताना अचानक पावसाला सुरुवात झाली. आडोशासाठी एका झाडाखाली उभे असताना ही घटना घडली.

कलमेश शिवनगौडा पाटील (वय 20), त्याची आई शांतव्वा शिवनगौडा पाटील (वय 45), सुशव्वा गौडाप्पा पाटील (वय 40), सिध्दव्वा नागाप्पा पाटील (वय 40), महादेवी अडव्याप्पा लकुंडी (वय 30, सर्व रा. तुम्मरगुद्दी) अशी जखमींची नावे असून सायंकाळी त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कलमेश त्याची आई शांतव्वा हे इतर तिघा जणांबरोबर शेतात काम करीत होते. कोबीचे तरु लागवड करताना शनिवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. वीजांचा कडकडाटही सुरु होता. त्यामुळे काम थांबवून हे सर्व पाच जण आडोशासाठी एका झाडाखाली थांबले होते. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हे सर्व जण थांबलेल्या झाडाजवळच वीज कोसळली.

 डोळय़ादेखत वीज कोसळल्याने त्याचा या महिलांना धक्मका बसला आहे. या धक्क्मयातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. सर्व पाच जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.