|Saturday, January 20, 2018
You are here: Home » Top News » भारतातील सर्वात मोठय़ा बोगद्याचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

भारतातील सर्वात मोठय़ा बोगद्याचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन 

ऑनलाईन टीम / उधमपूर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील सर्वात मोठय़ा बोगद्याचे उद्घाटन आज करण्यात येणार आहे. या बोगद्याचे अंतर 9.28 किलोमीटरचे असणार आहे. हा बोगदा देशातील सर्वात मोठा बोगदा असणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील रस्ते आणि लोहमार्गाचा विकास करण्यावर गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. जम्मू ते श्रीनगरला जोडण्यासाठी नशेरी ते चेनानी असा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे तब्बल 30 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. या नव्या बोगद्यामुळे दोन तासांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे दररोजचे 27 लाख रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. या बोगद्यासाठी अथक मेहनत करण्यात आली असून, यासाठी तब्बल 3 हजार 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

Related posts: