|Monday, November 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » आरोह-अश्विनीच्या जोडीची समर्पण कथा

आरोह-अश्विनीच्या जोडीची समर्पण कथा 

प्रेम हे असेच असते सरल्यावरही उरते… उरल्यावरही बहरत राहते. प्रेमात वाद नको असतो तर संवाद हवा असतो, प्रेमात राग नको असतो तर अनुराग हवा असतो, जीव देणे नको असते पण जीवाला जीव लावणे हवे असते. प्रेम ही भावनाच अमर्याद आहे. प्रेमात आखंड बुडणे, एखाद्या व्यक्तीसाठी  प्रेमात सर्वस्व त्यागणे ही भावनाच वेगळी आहे. अशाच काहीशा विचारांनी बहरलेली समर्पण ही नवीन गोष्ट झी युवा वरील ‘प्रेम हे’ या मालिकेतील नव्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. दिव्येश आणि रमाची अमर कहाणी झी युवावर 3 एप्रिल आणि 4 एप्रिल रात्री 9 वाजता पाहायला मिळेल.

आरोह वेलणकर म्हणजेच या गोष्टीतला दिव्येश, हा अतिशय श्रीमंत घरातील मुलगा असून अनेक वर्षे अमेरिकेत राहत होता. आधी अमेरिकेत आणि आता  भारतात आल्यावरही त्याची समाजाची नाळ कधीच तुटली नाही. अतिशय सुस्वभावी आणि सुशिक्षत असा दिव्येश हा अतिशय जीव लावणारा मुलगा. तर अश्विनी कासार म्हणजेच या गोष्टीतील रिमा ही मध्यमवर्गीय घरातील पण जबाबदारीची जाणीव असेलेली मुलगी, वडील गेल्यानंतरही खंबीरपणे घर सांभाळणारी दिव्या अतिशय स्वावलंबी आणि निरागस मुलगी आहे. ही गोष्ट तशी जुनी पण तेवढीच नवीन आहे. यात प्रेम, राग, द्वेष, मत्सर, सूड आहे आणि मुख्य म्हणजे समर्पण आहे. गोष्ट सुरु होते रिमाच्या घरावरून, दिव्येशचे वडील म्हणजेच कारखानीस हे मोठे बिल्डर असून त्यांना रिमाचे घर हवे आहे. वाट्टेल ते मार्ग वापरून ते रिमा आणि तिच्या आईला तिथून काढण्याचा प्रयत्न करत असतात. दिव्येश सुद्धा पहिला बिझिनेस पॉईंटच्या दृष्टीने वडलांना मदत करता. पण हळूहळू निरागस रिमाच्या प्रेमात पडतो. रिमालाही दिव्येश आवडू लागतो. पण… या पणच्या पलीकडे असं बरंच काही आहे जे पाहून प्रेम केलेल्या प्रत्येकाचे मन हेलावेल अशी ही कथा आहे.

Related posts: