|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » श्रीनगर विमानतळावर ग्रेनेड नेणाऱया जवानाला अटक

श्रीनगर विमानतळावर ग्रेनेड नेणाऱया जवानाला अटक 

श्रीनगर

 जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या विमानतळावर सोमवारी अपहरणविरोधी पथकाने 2 ग्रेनेड नेणाऱया लष्कराच्या एका जवानाला अटक केली आहे. जवानाचे नाव भूपल मुखिया असून तो मूळचा दार्जिलिंगचा रहिवासी आहे. भूपल विमानाने दिल्लीला जाण्याच्या तयारीत होता. चौकशीदरम्यान जवानाने ग्रेनेड आणल्याचे मान्य केले. नदीत मासेमारीसाठी ग्रेनेडचा वापर करणार होता तसेच या प्रकरणात कनिष्ठ स्तराचा अधिकारी देखील सामील असल्याचे जवानाने चौकशीवेळी सांगितले. मुखियाच्या बॅगेतून ग्रेनेड हस्तगत करण्यात आले, तो दिल्लीतील एका व्यक्तीला ही बॅग देण्यासाठी जात होता असे समोर आले. तो उरी येथे 17 जेअँडके रायफल्समध्ये तैनात आहे.

 श्रीनगर विमानतळाला देशाच्या सर्वाधित सुरक्षित विमानतळांपैकी एक मानले जाते. लष्कर किंवा पोलिस दलाचा जवान असला तरीही त्याच्यावर कायद्याच्या हिशेबाने कारवाई होईल असे राज्याचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी सांगितले. शनिवारीच बारामुल्लाच्या तुरुंगातून 14 मोबाईल जप्त करण्यात आले होते.

Related posts: