|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » रियल माद्रीदचे पहिले स्थान अधिक भक्कम

रियल माद्रीदचे पहिले स्थान अधिक भक्कम 

वृत्तसंस्था/ माद्रीद

ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या सामन्यात रियल माद्रीद संघाने अल्व्हेसचा 3-0 असा दणदणीत पराभव करून गुणतक्त्यातील आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले. या विजयामुळे रियल माद्रीदचा संघ 68 गुणांसह पहिल्या स्थानावर असून बार्सिलोनाचा संघ  63 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.रियल माद्रीद आणि अल्व्हेस यांच्यातील रविवारचा सामना एकतर्फी झाला. 31 व्या मिनिटाला करीम बेंझेमाने रियल माद्रीदचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत रियल माद्रीदने 1-0 अशी आघाडी राखली होती. 85 व्या मिनिटाला इस्कोने तर 88 व्या मिनिटाला नॅचो यांनी प्रत्येकी एक गोल करून रियल माद्रीदच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. स्पोर्टिंग गिजॉनने सेव्हिलाला गोलशून्य बरोबरीत रोखले त्यामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात सेव्हिला संघाला पहिल्या तीन संघामध्ये स्थान मिळविता आले नाही. रियल माद्रीदचा या स्पर्धेतील आणखी एक सामना बाकी असून तो मे महिन्यात सेल्टा व्हिगो संघाविरूद्ध होईल. सेव्हिला या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 58 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. ऍटलेटिको माद्रीदने मालेगाचा 2-0 असा पराभव केला.

Related posts: