|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावसह सहा शहरात होणार सायबर क्राईम पोलीसस्थानक

बेळगावसह सहा शहरात होणार सायबर क्राईम पोलीसस्थानक 

प्रतिनिधी / बेळगाव

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे बेळगावसह राज्यातील सहा शहरात सायबर क्राईम पोलीस स्थानक सुरू करण्यास गृहखात्याने मंजुरी दिली आहे. यामध्ये बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर, हुबळी-धारवाड, बेळगाव व गुलबर्गा शहरांचा समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार लवकरच या सहा पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात सायबर क्राईम विभाग सुरू करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या पोलीस स्थानकात सायबर क्राईम संबंधीचे गुन्हे हाताळणे पोलिसांना कठीण जात आहे. त्यामुळे पोलीस दलातील 250 हून अधिक जणांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना या नव्या सायबर क्राईम पोलीस स्थानकात जुंपण्यात येणार आहे.

महिला पोलीस स्थानकांची संख्या वाढणार

चोऱया, घरफोडय़ांपेक्षाही ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढत चालले आहेत. राज्यात 41 नवी पोलीस स्थानके स्थापन करण्यासाठी गृहखात्याने मंजुरी दिली असून  यामध्ये 6 सायबर क्राईम पोलीस स्थानकांचा समावेश आहे. विशेष सायबर क्राईम विभाग व महिला पोलीस स्थानकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. राज्य पोलीस महासंचालक रुपक कुमार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नव्याने स्थापन करण्यात येणाऱया सायबर क्राईम पोलीस स्थानकात 43 पोलीस असणार आहेत. एक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, चार हवालदार असणार आहेत. सध्या नागरी पोलिसांबरोबरच ऑनलाईन फसवणूक प्रकरणी दाखल होणाऱया गुह्यांचा तपास सीआयडीचे अधिकारी करतात. आता अशा प्रकरणांच्या तपासासाठी लवकरच स्वतंत्र पोलीस स्थानक सुरू करण्यात येणार आहे.

 प्रयोगशाळाही सुरू होणार

एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून बेळगावसह संपूर्ण राज्यभरातील बँक ग्राहकांची फसवणूक सुरू आहे. पेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातूनही आर्थिक फसवणूक केली जात आहे. सोशल मीडियावर प्रति÷ित व्यक्तींची बदनामी करणारा मजकूर टाकला जात आहे. अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र सायबर क्राईम पोलीस स्थानकाची स्थापना करण्यात येणार असून यासाठी आवश्यक प्रयोगशाळाही सुरू करण्यात येणार आहे